Bhai Dooj 2023 : यमराजासोबतच चित्रगुप्ताचाही आहे भाऊबीजेशी संबंध, अशी आहे पौराणिक कथा

या दिवशी जी बहिण भावाला ओवाळते त्या भावाचा अकाली मृत्यू होत नाही अशी धार्मिक श्रद्धा आहे . यंदा भाईदूजच्या तारखेबाबत बराच गोंधळ आहे. काही 14 नोव्हेंबरला तर काही 15 नोव्हेंबरला भाऊबीज साजरी करत आहेत. भाऊबीज सण कधी साजरा केला जाईल हे जाणून घेऊया.

Bhai Dooj 2023 : यमराजासोबतच चित्रगुप्ताचाही आहे भाऊबीजेशी संबंध, अशी आहे पौराणिक कथा
भाऊबीजImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Nov 14, 2023 | 2:28 PM

मुंबई : कार्तिक शुक्ल द्वितीया तिथीला भाऊबीज (Bhai Dooj) हा सण साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावाला औक्षवण करते आणि त्याच्या मंगलमय आयुष्यासाठी कामना करते. या दिवशी जी बहिण भावाला ओवाळते त्या भावाचा अकाली मृत्यू होत नाही अशी धार्मिक श्रद्धा आहे . यंदा भाईदूजच्या तारखेबाबत बराच गोंधळ आहे. काही 14 नोव्हेंबरला तर काही 15 नोव्हेंबरला भाऊबीज साजरी करत आहेत. भाऊबीज सण कधी साजरा केला जाईल हे जाणून घेऊया. ज्योतिषी पराग कुळकर्णी यांनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिक शुक्ल द्वितीया तिथी 14 नोव्हेंबर रोजी दुपारी 02.36 वाजता सुरू होईल आणि 15 नोव्हेंबर रोजी दुपारी 01.47 वाजता समाप्त होईल. ओरिया तिथीमुळे, बुधवार, 15 नोव्हेंबर रोजी भाऊबीजची सण साजरा केला जाईल.

भाऊबीज शुभ मुहूर्त

भाऊबीजेला भावाला औक्षवण करण्यासाठी दोन शुभ मुहूर्त आहेत. पहिला शुभ मुहूर्त 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 6.44 ते 9.24 पर्यंत आहे. तर दुसरा शुभ मुहूर्त सकाळी 10.40 ते दुपारी 12 पर्यंत आहे.

अशी साजरी करा भाऊबीज

भाऊबीजेच्या गंगाजल मिश्रीत किंवा शुद्ध पाण्याने स्नान करावे. बहिणीने भावाकडे जावून कींवा भावाने बहिणीकडे जावून एकत्र सण साजरा करावा. बहिणीने भावाला जेवणासाठी निमंत्रीत करावे आणि त्याला औक्षवण करावे. त्यानंतर भावाने आपल्या क्षमतेनुसार बहिणीला काही भेटवस्तू द्यावी.

हे सुद्धा वाचा

बहिण यमराजाला प्रसन्न करण्यासाठी भाऊबीजेचे म्हणजेच यम द्वितीयेचे व्रत देखील ठेवतात. भाऊबीजेच्या दिवशी यमराजासह त्याचा सचिव चित्रगुप्त यांचीही पूजा केली जाते. ज्योतिषांच्या मते चित्रगुप्ताची विशेष पूजा केल्यानेच पूर्ण लाभ होतो.

भाऊबीजेला  चित्रगुप्ताची पूजा का केली जाते

भगवान ब्रह्मदेवाच्या ह्रदयातून  चित्रगुप्ताचा जन्म झाला अशी धार्मिक मान्यता आहे. मणुष्याच्या कर्माची नोंद ठेवणे हे त्यांचे काम आहे. मुख्यतः भाऊबीजेच्या दिवशी त्यांची पूजा केली जाते. त्याची पूजा केल्याने लेखन, वाणी आणि ज्ञानाचे वरदान मिळते. भगवान चित्रगुप्ताच्या मूर्तीची स्थापना करा. त्यांच्यासमोर तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर फुले व मिष्ठान्नाचा नैवेद्य दाखवा.

एका पांढऱ्या कागदावर हळद लावून त्यावर “श्री गणेशाय नमः” असे लिहावे. नंतर 11 वेळा “ओम चित्रगुप्ताय नमः” लिहा. भगवान चित्रगुप्ताला ज्ञान, बुद्धी आणि लेखनाच्या वरदानासाची प्रार्थना करा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.