Bhanu Saptami 2023 : करियरमध्ये गाठायचे असेल उंच शिखर तर भानुसप्तमीला अवश्य करा हे उपाय

भानु सप्तमी (Bhanu Saptami 2023) तिथी सूर्य देवाला समर्पित आहे. भानु सप्तमी दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी साजरी केली जाते. यावर्षी भानु सप्तमी 25 जून 2023 रोजी रविवारी साजरी केली जाणार आहे.

Bhanu Saptami 2023 : करियरमध्ये गाठायचे असेल उंच शिखर तर भानुसप्तमीला अवश्य करा हे उपाय
भानु सप्तमीImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jun 23, 2023 | 7:51 PM

मुंबई : सूर्यदेवाला यश, आरोग्य, आत्मविश्वास, नेतृत्व याचा कारक मानन्यात योतो . सूर्यदेवाची उपासना केल्याने माणसाला भरपूर यश मिळते, आरोग्य मिळते. हिंदू धर्मात सूर्याला अर्घ्य अर्पण करणे, सूर्याची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. दुसरीकडे, भानु सप्तमी (Bhanu Saptami 2023) तिथी सूर्य देवाला समर्पित आहे. भानु सप्तमी दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी साजरी केली जाते. यावर्षी भानु सप्तमी 25 जून 2023 रोजी रविवारी साजरी केली जाणार आहे. रविवार हा सूर्य देवाला समर्पित असल्याने, भानु सप्तमी रविवारी आल्याने त्याचे महत्त्व अधिकच वाढले आहे. भानु सप्तमीच्या दिवशी केलेले उपाय सूर्यदेवाची अपार आशीर्वाद देतात, यामुळे जीवनात मोठे यश मिळते, तसेच जीवनातील सर्व अडथळे दूर होतात.

भानु सप्तमीचे उपाय

भानु सप्तमीला सकाळी लवकर स्नान करावे. या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून आंघोळ करून केशरी रंगाचे कपडे घालणे चांगले. यानंतर तांब्याच्या भांड्यात अक्षत, लाल फुले, चंदन आणि साखर टाका. त्यानंतर ते पाण्याने भरून सूर्यदेवाच्या ‘ओम सूर्याय नमः’ मंत्राचा उच्चार करताना सूर्यदेवाला जल अर्पण करावे. असे केल्याने सूर्यदेव लवकर प्रसन्न होतात.

  • भानु सप्तमीच्या दिवशी सकाळी सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर आदित्यने हृदय स्तोत्राचे पठण करावे. यामुळे सूर्यदेवाची कृपा प्राप्त होते.
  • भानु सप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी सूर्यदेवाची पूजा केल्यानंतर लाल वस्त्र, गहू, तांबे, गूळ इत्यादींचे दान करावे. सूर्याशी संबंधित वस्तू गरीब ब्राह्मणाला दान केल्याने कुंडलीत सूर्य बलवान होतो.
  • भानू सप्तमीच्या दिवशी सूर्य चालिसाचा पाठ केल्याने आणि सूर्यदेवाची आरती केल्यानेही खूप फायदा होतो.
हे सुद्धा वाचा

जर तुम्हाला नियमानुसार सूर्यदेवाची उपासना करता येत नसेल तर किमान सूर्य मंत्रांचा जप करा. 1. ॐ मित्राय नमः. 2. ॐ रवये नमः. 3. ॐ सूर्याय नमः. 4. ॐ भानवे नमः. 5. ॐ खगाय नमः. 6. ॐ पूष्णे नमः. 7. ॐ हिरण्यगर्भाय नमः. 8. ॐ मरीचये नमः. 9. ॐ आदित्याय नमः. 10. ॐ सवित्रे नमः. 11.ॐ अर्काय नमः. 12. ॐ भास्कराय नमः.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला
'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला.
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण.
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?.
बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? फडणवीसांची का घेतली भेट?
बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? फडणवीसांची का घेतली भेट?.
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच एकच वाक्य म्हणाले...
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच एकच वाक्य म्हणाले....
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?.
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?.
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच..
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?.