Bhaubeej 2023 : आज भाऊबीज, या मुहूर्तावर करा भावाला औक्षण
Bhaubeej भाऊबीजेचा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी बहिणींनी बनवलेले अन्न खाल्ल्याने भावांना जीवनातील प्रत्येक आनंद मिळतो. तसेच या दिवशी यमराज आणि यमुना देवीची पूजा केल्याने जाणून-बुजून झालेल्या पापांपासून मुक्ती मिळते. भाऊबीजेच्या दिवशी संध्याकाळी 4 वाताचा दिवा लावणे आणि दिपदान केल्याने सुख-समृद्धी मिळते, असे म्हटले जाते.

मुंबई : दिवाळीच्या दोन दिवसांनी, आज भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचे प्रतीक असलेला भाऊबीजचा (Bhaubeej) सण साजरा केला जाणार आहे. या वर्षी भाऊबीज बुधवार, 15 नोव्हेंबर 2023 रोजी आहे. या दिवशी भाऊ आपल्या बहिणीच्या घरी ओवाळून घेण्यासाठी जातात. पौराणिक कथेनुसार भाऊबीज हा सण मृत्यूच्या देवता यमराजाशी संबंधित आहे, म्हणून या सणाला यम द्वितीया असेही म्हणतात. हिंदू कॅलेंडरनुसार, कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीज हा सण साजरा केला जातो.
जर तुम्ही आज 15 नोव्हेंबरला भाऊबीज साजरी करत असाल तर यावेळी तुमच्या भावाला औक्षवण करण्यासाठी दोन शुभ मुहूर्त आहेत. पहिला शुभ मुहूर्त 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 6.44 ते 9.24 पर्यंत आहे. तर दुसरा शुभ मुहूर्त सकाळी 10.40 ते दुपारी 12 पर्यंत आहे.
भाऊबीजला भत्री द्वितीया असेही म्हणतात. भाऊ-बहिणीच्या नात्यात या सणाला विशेष महत्त्व आहे. भाऊबीजच्या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी प्रार्थना करतात. पौराणिक कथेनुसार, भगवान सूर्याची पत्नी छाया हिला यमराज आणि यमुना ही दोन मुले होती. यमुनेचे तिचा भाऊ यमराजावर खूप प्रेम होते. ती त्यांना नियमितपणे तिच्या घरी जेवायला बोलवायची. यमराज आपल्या बहिणीच्या निमंत्रणांकडे वारंवार दुर्लक्ष करायचे. कार्तिक शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी यमुनेने यमराजाला वचन दिले आणि त्याला तिच्या घरी येण्यास भाग पाडले. तेव्हापासून भाऊबीज साजरा करण्याची परंपरा सुरू आहे.




भाऊबीजेला अशा प्रकारे करा पूजा
सकाळी लवकर उठून स्नान करून देवघरामसोर दिवा लावून देवाचे ध्यान करावे. भगवान विष्णू आणि गणेशाची पूजा करा. या दिवशी भावाला घरी बोलावून औक्षवण करा त्याला जेवायला बोलवा. आपल्या भावाच्या हातावर मौली धागा बांधा आणि त्याला मिठाई खाऊ घाला. भावाने आपल्या बहिणीला काहीतरी भेट दिली पाहिजे. ज्यामुळे भाऊ-बहिणीतील प्रेम वाढते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)