तुळजाभवानी दागिने गहाळ प्रकरणी मोठी अपडेट, दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

गेल्या अनेक वर्षापासून तुळजाभवानी मंदिरातील देवीच्या पुरातन दागिन्याची मोजतात झाली नव्हती, ती मोजतात जिल्हाधिकारी यांनी करण्याचे आदेश दिले व त्यानंतर त्या मोजदादीमध्ये अनेक मौल्यवान अलंकार सोने-चांदीच्या वस्तू गहाळ असल्याचं समोर आलं. या गहाळ वस्तूची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिले आहेत.

तुळजाभवानी दागिने गहाळ प्रकरणी मोठी अपडेट, दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश
तुळजाभवानी Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Dec 12, 2023 | 4:45 PM

धाराशिव : महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या मंदिरातून (Tuljabhavani Temple) दागिणे गहाळ झाल्याची घटना 6 डिसेंबर 2023 रोजी समोर आली होती. देवीच्या सोन्याच्या मुकूटासह इतर दागिने गहाळ झाल्याने खळबळ उडाली आहे. मंदीर संस्थांनानं उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या 16 सदस्य समितीने दिलेल्या अहवालात धक्कादायक माहिती उघड झाली होती. आता या प्रकरणात नवीन अपडेट समोर आले आहे. तुळजाभवानीच्या पुरातन सोने चांदीच्या अलंकारावर डल्ला मारणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे.  चौकशी समितीच्या अहवालानंतर जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी हे आदेश दिले. महंत ( पुजारी ) सेवेकरी व प्रशासकीय अधिकारी यांच्यावर गुन्हे नोंद करण्याचे आदेश आज देण्यात आले.

काय आहे नेमके प्रकरण?

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी मंदिरात लाखो भाविक देशभरातून दर्शनासाठी येतात. अनेकांची कुलदेवी असल्याने भाविक देवीला नवस बोलतात. नवस पूर्ण झाल्यावर अनेक भक्त श्रद्धेने कबुल केल्याप्रमाणे सोन्याचे दागीने आणि वस्तू देवीच्या चरणी अर्पण करतात. हे दागीणे मंदिर संस्थान नोंदणी करून सुरक्षीत ठेवते. या शिवाय देवीच्या अलंकारांचीसुद्ध जबाबदारी मंदिर प्रशासनाकडे आहे, मात्र समोर आलेल्या माहिती नुसार देवीच्या 27 अलंकारा पैकी 4 अलंकार गायब झाले तर 12 पदराच्या 11 पुतळ्या असलेले मंगळसूत्रावर देखील डल्ला मारण्यात आला. यामध्ये  826 ग्राम म्हणजे पाऊण किलो पेक्षा जास्त वाजनाचा सोन्याचा मुकुट आणि चांदीच्या वस्तू देखील गहाळ आहे.

गेल्या अनेक वर्षापासून तुळजाभवानी मंदिरातील देवीच्या पुरातन दागिन्याची मोजतात झाली नव्हती, ती मोजतात जिल्हाधिकारी यांनी करण्याचे आदेश दिले व त्यानंतर त्या मोजदादीमध्ये अनेक मौल्यवान अलंकार सोने-चांदीच्या वस्तू गहाळ असल्याचं समोर आलं. या गहाळ वस्तूची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिले आहेत.

हे सुद्धा वाचा

अलंकाराची मोजदाद झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी फौजदारी कार्यवाही करण्यासाठी कायदेशीर समिती नेमली होती त्या समितीने दिलेला अहवालात तुळजाभवानी देवीचे अनेक पुरातन अलंकार सोन्या-चांदीचे दागिने हे गहाळ झाल्याचं समोर आलं आहे. त्यात हे दागिने व अलंकार ज्यांच्या ताब्यात आहेत त्यांच्यावर ही जबाबदारी निश्चित करून हे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत त्यात प्रामुख्याने महंत सेवेकरी व प्रशासकीय अधिकाऱ्यांचा देखील समावेश असून त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल होणार आहेत.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.