Baba Vanga Prediction : गोष्ट ऐकली तरी अंगावर काटा येईल, Putin बनणार “जगाचे स्वामी”, बाबा वेंगाची भविष्यवाणी
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याबद्दल बल्गेरियाचे (Bulgaria) अंध बाबा वेंगा (Baba Vanga) यांची भविष्यवाणी सोशल मीडियावर व्हायरल (Viral) झाली आहे.
मुंबई : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याबद्दल बल्गेरियाचे (Bulgaria) अंध बाबा वेंगा (Baba Vanga) यांची भविष्यवाणी सोशल मीडियावर व्हायरल (Viral) झाली आहे. या अधीसुद्धा बाबा वेंगाने अनेक भविष्यावाण्या केल्या आहेत आणि त्या तंतोतत खऱ्या ठरल्या आहेत. रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे. दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू आहे. रशियाने युक्रेनमध्ये नासधूस केली असून मोठे नुकसान केले आहे. युक्रेनची राजधानी कीवसह देशातील अनेक शहरांतील इमारतींसह मालमत्तेचे नुकसान झाले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची हुकूमशाही वृत्ती जग पाहत आहे. आता रशिया पुन्हा एकदा जगाचा राजा होणार की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. यातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याबद्दल बल्गेरियाचे (Bulgaria) अंध बाबा वेंगा (Baba Vanga) यांची भविष्यवाणी सोशल मीडियावर व्हायरल (Viral) झाली आहे. 11 सप्टेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे अचूक भाकीत करणाऱ्या बाबा वेंगा यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन एक दिवस जगावर राज्य करतील असे म्हटले होते.त्यांचे स्वतःचे अंदाज 85 टक्के खरे ठरतात असे मानले जाते.
‘बाल्कनचा नॉस्ट्रॅडॅमस’
बाबा वेंगा यांना ‘बाल्कनचा नॉस्ट्रॅडॅमस’ म्हणूनही ओळखले जाते. वाएन्गा यांनी लेखक व्हॅलेंटिन सिदोरोव्हला सांगितले की रशिया “जगाचा स्वामी” बनेल, तर युरोप “ओसाड जमीन” बनेल. बाबा वेंगा यांनी पुतीन यांच्या संभाव्य संदर्भामध्ये भाकीत केले आणि सांगितले, की सर्व काही वितळून जाईल बर्फासारखे मात्र एकच गोष्ट राहील ती म्हणजे व्लादिमीर यांचे वैभव, रशियाचे वैभव… ते पुढे म्हणाले, की रशियाला कोणीही रोखू शकत नाही.
बाबा वेंगा कोण? जाणून घ्या
बाबा वेंगा यांचं खरं नाव वेंगेलिया गुश्तेरोवा असं आहे. त्यांचा जन्म 1911मध्ये झाला. त्यांनी दावा केला, की वयाच्या 12व्या वर्षी एका मोठ्या वादळात त्यांची दृष्टी गूढपणे गेली. त्यानंतर त्यांना भविष्याकडे पाहण्यासाठी देवाकडून एक अत्यंत दुर्मीळ भेट देण्यात आली. 1996मध्ये जेव्हा त्यांचा मृत्यू, झाला तेव्हा त्यांनी 5079पर्यंत चालणारी भविष्यवाणी केली होती. या वर्षी जगाचा अंत होईल, असे भाकीत त्यांनी केले होते. विशेष म्हणजे, वेंगा यांनी आपल्या मृत्यूची स्वत:च भविष्यवाणी केली होती. तीही अचूक ठरली.
आतापर्यंत खऱ्या ठरलेल्या भविष्यवाणी
बाबा वेंगा यांनी भारताबाबत भाकीत केले होते, की येथील तापमान 50 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होईल. त्यामुळे पिकांवर परिणाम होऊन दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होईल. 2022मध्ये जगातील मोठ्या शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचे परिणाम दिसून येतील, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर नद्यांच्या प्रदूषणामुळे वाहणारे पाणी कमी होईल. 2022मध्ये लोक पूर्वीपेक्षा जास्त वेळ स्क्रीनवर घालवतील, म्हणजेच लोक संगणक आणि मोबाइलवर जास्त वेळ घालवतील. ५०७९ साली जगाचा अंत होईल, असं बाबा वेंगा यांचं म्हणणं होतं. आपल्या मृत्यूपूर्वी सोव्हिएत युनियनचं विघटन, 2002 मध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ला, 2004 साली आलेली त्सुनामी, एका आफ्रिकन अमेरिकन व्यक्तीची अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवड, ब्रिटनची राजकुमारी डायना हिचा मृत्यू तसंच २०१० ची ‘अरब स्प्रिंग’ यांसारखे अनेक अचूक अंदाज बाबा वेंगा यांनी बांधले होते.
संबंधीत बातम्या :
29 March 2022 Panchang : 29 मार्च 2022, मंगळवारचे पंचांग, शुभ मुहूर्त आणि राहू वेळ
Lord Shiva Worship Rules | भगवान शंकराची पूजा करताना या सात महत्त्वाच्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा
राम कृष्ण हरी ! पापमोचनी एकादशी निमित्त संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात आकर्षक सजावट