Body Moles Indication : चेहऱ्यावरील तीळ सांगतात तुमच्या आयुष्यातील अनेक रहस्य, जाणून घ्या तुमच्या नशीबाबद्दल
आपल्या शरीराच्या (Body) अनेक भागांवर तीळ असतात. हे तिळ काळे, तपकिरी आणि लाल रंगाचे असू शकतात. जर हे तीळ (Facial moles) तुमच्या चेहऱ्यावर असतील तर ते सुंदर दिसतात.
मुंबई : आपल्या शरीराच्या (Body) अनेक भागांवर तीळ असतात. हे तिळ काळे, तपकिरी आणि लाल रंगाचे असू शकतात. जर हे तीळ (Facial moles) तुमच्या चेहऱ्यावर असतील तर ते सुंदर दिसतात. पण ज्योतिष शास्त्रानुसार हे तीळ तुमच्या आयुष्यातील (Life) अनेक रहस्ये सांगतात. समुद्रशास्त्रानुसार, तिळाच्या माध्यमातून व्यक्तीच्या जीवनाशी संबंधित अनेक रहस्ये सहज उलगडली जाऊ शकतात. काही ठिकाणी तीळ असणे भाग्यवान ठरते, त्यामुळे काहीवेळा ते अशुभ म्हणूनही पाहिले जातात. तिळ तुमच्या सौर्दयात भर टाकतात पण हे तिळ तुमचे भविष्य सुद्धा सांगू शकतात. तुमच्या जोडीदाराच्या तीळची खूण पाहूनही तुम्ही त्याच्या मनातील रहस्य जाणून घेऊ शकता समुद्र शास्त्रानुसार तुमच्या चेहऱ्यावरील तीळ काय सांगतात ते येथे जाणून घ्या .
- सामुद्रिक शास्त्रानुसार, ज्या व्यक्तीच्या वरच्या ओठावर तीळ असतो, त्याला जीवनात सुख-सुविधांशी संबंधित सर्व साधने सहज प्राप्त होतात. दुसरीकडे, जर एखाद्या महिलेच्या वरच्या ओठावर तीळ असेल तर ती खूप भाग्यवान असते.
- सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या लोकांच्या कपाळाच्या मध्यभागी तीळ किंवा चामखीळ असते, ते खूप भाग्यवान असतात.
- ज्या लोकांच्या कानावर तीळ असतो ते सहसा मेहनती आणि प्रामाणिक असतात. असे लोक जीवनात सतत प्रगती करतात आणि भरपूर पैसा जमा करतात.
- ज्या लोकांच्या छातीच्या डाव्या बाजूला तीळ किंवा चामखीळ असते, अशा व्यक्ती कामुक असतात आणि त्यांचे लग्न थोड्या उशिरा होते.
- ज्या लोकांच्या छातीच्या उजव्या बाजूला तीळ असतो, ते सुखी आणि समृद्ध असतात आणि त्यांना जीवनात सुंदर आणि योग्य जीवनसाथी मिळतो.
- सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या लोकांच्या डोळ्यांवर तीळ असतो, ते इतरांना सहज आकर्षित करतात. अशा लोकांना आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर नशीब चमकते.
- ज्या लोकांच्या तळहाताच्या मध्यभागी तीळ चिन्ह असते, त्यांच्याकडे भरपूर संपत्ती असते आणि त्यांना जीवनात सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते.
- ज्या लोकांच्या गळ्यावर तीळ असतो, त्यांच्या आवाजात अनेकदा आकर्षण असते. अशा लोकांना गीत-संगीत आणि सर्व प्रकारच्या कलांमध्ये रस असतो.
- एखाद्या व्यक्तीच्या उजव्या कपाळावर तीळ असल्यास त्याचे सुख आणि भाग्य वाढते, परंतु जर डाव्या कपाळावर तीळ असेल तर त्याला सर्व प्रकारचे सुख प्राप्त करण्यासाठी सर्व प्रकारच्या अडथळ्यांचा सामना करावा लागतो.
(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)
Chanakya Niti : तुमच्या मुलांसमोर ‘या’ 4 गोष्टी ठेवा, कधीही पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही
Vastu : घरात लक्ष्मी यंत्राची पूजा केल्यास, धनाचा वर्षाव होईल, जाणून घ्या रंजक माहिती
17 February 2022 Panchang : 17 फेब्रुवारी 2022, गुरुवारचे पंचांग, शुभ मुहूर्त आणि राहुकाळ