Vastu Tips For house: वास्तुशास्त्रानुसार (Vastushastra) काही गोष्टी घरा आणणं अत्यंत शुभ मानलं जातं. वास्तु, ज्योतिषशास्त्रामध्ये हत्तीला खूप शुभ मानले जाते. शास्त्रांमध्ये हा प्राणी विघ्नहर्ता गणपती (Ganpati) आणि संपत्तीची देवी लक्ष्मी (Laxmi) यांच्याशी संबंधित आहे. चला जाणून घेऊया चांदीच्या हत्तीची मूर्ती घरात ठेवण्याचे काय काय फायदे आहेत.
जीवनात यश आणि सफलता मिळविण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळे प्रयत्न करत असतो. सुख,शांती, तसंच समृद्धी मिळविण्यासाठी लोक अनेक प्रकारे मेहनत करतात.वेगवेगळे उपाय करतात. खूप मेहनत करूनही काही लोकांना आयुष्यात यश मिळत नाही. (Success In life)यश मिळालं तरी ते जास्त काळ टिकत नाही. जीवनात अनेक प्रकारच्या समस्या असतात त्यात पैश्याची कमतरता ही सर्वात मोठी आणि त्रासदायक समस्या असते. कही लोकांच्या नशीबात पैसा तर असतो पण तो टिकत नाही. त्यामागे वास्तू दोष असावेत असं मानलं जातं. वास्तु दोषामुळे शारिरीक आणि मानसिक समस्या देखील होतात. यादोषातुन मुक्ती मिळविण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारचे उपाय करू शकता. ज्यापैकी एक घरात चांदीचा हत्ती आणणं हा आहे.
वास्तु शास्त्रानुसार अनेक गोष्टी शुभ मानल्या गेल्या आहेत. कही गोष्टी घरात आणल्याने घरात सुख, शांती येते. घरात चांदीचा हत्ती आणल्याने घरातील नकारात्मकता दूर होते. त्याने धनासंपत्ती मिळविण्याचा लाभ देखील मिळतो. जाणून घेऊया चांदीचा हत्ता घरात आणण्याचे फायदे.
शास्त्रानुसार वास्तु, ज्योतिषशास्त्रामध्ये हत्तीला खूप शुभ मानले जाते. शास्त्रांमध्ये हा प्राणी विघ्नहर्ता गणपती आणि संपत्तीची देवी लक्ष्मी यांच्याशी संबंधित आहे. याचा संबंध गणपत्ती बाप्पांशी असतो. हत्तीची देखभाल केल्याने गणेशाची कृपा लाभते. काही लोक गणेशाला प्रसन्न करण्यासाठी हत्ताची पूजा देखील करतात. हत्ती पाळीव प्राणी नसल्याने तो पाळणं प्रत्येकालाच शक्य नाही. तुम्ही चांदीचा हत्ती घरी आणू शकता. त्याचो दोन लाभ आहेत. एक हत्ती घरात येतोय तर दुसरं चांदीचा त्यामुळे तो शुभ असणारच.
तुम्हाला घरात चांदीचा हत्ती ठेवायचा असेल तर तो वास्तू शास्त्राच्या नियमानुसारच ठेवा. वास्तु नियमानुसार तुम्ही तो लिव्हिंग रूम म्हणजेच हॉल मध्ये ठेवू शकता. पूर्व दिशेलाच हत्ती ठेवावा. हत्ती स्वयपाक घरात ठेवू नका. तुम्ही ऑफिस मध्ये डेस्कवर हत्ती ठेवू शकता. त्याने तुमच्या धनाच्या मार्गातील अडथळे दूर होतील. धनप्राप्तीसाठी चांदीच्या हत्तीचा उपाय नक्की करा.
(दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे. याबाबत आम्ही कोणताही दावा करत नाही.)