Buddha Purnima 2023 : कधी आहे बुद्ध पोर्णिमा? यंदाची बुद्ध पोर्णिमा या कारणासाठी आहे विशेष
हिंदू धर्मातील लोकांसाठी वैशाख पौर्णिमा जशी महत्त्वाची आहे, त्याचप्रमाणे बौद्ध धर्माच्या लोकांसाठी बुद्ध पौर्णिमा महत्त्वाची आहे. या तिथीचा भगवान बुद्धांच्या जीवनाशी विशेष संबंध आहे, कारण त्यांचा जन्म या तारखेला झाला होता.
मुंबई : वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा (Buddha Purnima 2023) साजरी केली जाते. वैशाख पौर्णिमाही याच दिवशी येते. हिंदू धर्मातील लोकांसाठी वैशाख पौर्णिमा जशी महत्त्वाची आहे, त्याचप्रमाणे बौद्ध धर्माच्या लोकांसाठी बुद्ध पौर्णिमा महत्त्वाची आहे. या तिथीचा भगवान बुद्धांच्या जीवनाशी विशेष संबंध आहे, कारण त्यांचा जन्म या तारखेला झाला होता. यावर्षी बुद्ध पौर्णिमेला सिद्धी योग तयार झाला असून भद्रकाळही आहे. यंदा वर्षातील पहिले चंद्रग्रहण बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी होणार आहे. या दिवशी माता लक्ष्मी, नारायण आणि चंद्रदेव यांची पूजा केली जाते. या दिवशी केलेल्या दानाचेही विशेष महत्त्व आहे. बुद्ध पौर्णिमा किंवा वैशाख पौर्णिमा किती तारखेला आहे आणि त्याचे महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया.
बुद्ध पौर्णिमा कधी आहे?
यावेळी बुद्ध पौर्णिमा 5 मे रोजी आहे. यंदाचे पहिले चंद्रग्रहण बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी होणार आहे. असे मानले जाते की बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्याने पापांपासून मुक्ती मिळते.
बुद्ध पौर्णिमा 2023 तारीख
वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाची पौर्णिमा 4 मे गुरुवारी रात्री 11.45 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 5 मे शुक्रवारी रात्री 11.29 वाजता समाप्त होईल.
वर्षातील पहिले चंद्रग्रहण बुद्ध पौर्णिमेला होणार आहे
या वर्षातील पहिले चंद्रग्रहण बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी होणार आहे. 5 मे रोजी रात्री 8.45 वाजता चंद्रग्रहण सुरू होईल आणि पहाटे 1 वाजता संपेल. चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी ९ तास आधी सुरू होतो. परंतु, हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे सुतक कालावधी वैध राहणार नाही. वर्षातील हे पहिले चंद्रग्रहण पेनम्ब्रल चंद्रग्रहण असणार आहे.
बुद्ध पौर्णिमेचे महत्त्व
वैशाख पौर्णिमेला भगवान गौतम बुद्ध यांचा जन्मदिवसही साजरा केला जातो. मान्यतेनुसार, या दिवशी भगवान बुद्धांना बोधगयेतील बोधीवृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले. या दिवशी कूर्म जयंतीही साजरी केली जाते. वास्तविक भगवान विष्णूंनी पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी कूर्म अवतार घेतला होता. या दिवशी गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली. भगवान विष्णूला मानणाऱ्यांसाठी हा दिवस खूप खास आहे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)