Budh Pradosh Vrat : उद्या बुध प्रदोष व्रत, या विशेष उपायांनी प्राप्त होईल महादेवाची कृपा
धार्मिक मान्यतेनुसार बुध प्रदोष व्रत केल्यास व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. दुःखापासून मुक्ती मिळवण्यासाठीदेखील हे व्रत केले जाते.
मुंबई : उद्या 27 सप्टेंबर रोजी बुध प्रदोष व्रत (Budh Pradosh Vrat) पाळले जाणार आहे. दर महिन्याला कृष्ण आणि शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत पाळले जाते. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. यासोबतच उपवासही केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार बुध प्रदोष व्रत केल्यास व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. दुःखापासून मुक्ती मिळवण्यासाठीदेखील हे व्रत केले जाते. बुध प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची विधीवत पूजा केल्यास ते प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात. बुध प्रदोष व्रताच्या दिवशी पूजेसोबत काही विशेष उपाय केल्यास दुप्पट फळ मिळते.
सौभाग्याचे वाण दान करा
जे लोकं बुध प्रदोषाच्या दिवशी व्रत करतात त्यांनी आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी विधीनुसार भगवान शिवाची पूजा करावी. महिलांनी देवी पार्वतीची पूजा करावी आणि एखाद्या गरजू स्त्रीला सौभाग्याचे साहित्य दान करावे. असे केल्याने तुमच्या कुटुंबात आनंद राहील आणि सौभाग्य प्राप्त होईल.
बुध मंत्राचा जप करावा
जर तुमच्या पत्रिकेत बुधाशी संबंधित दोष असतील किंवा तुम्हाला बुध अनुकूल बनवायचा असेल तर बुध प्रदोषाच्या दिवशी 9000 वेळा बुध मंत्राचा जप करा. जर एका दिवसात जप पूर्ण करणे शक्य नसेल तर बुध प्रदोषापासून मंत्राचा जप सुरू करा आणि नियमितपणे 9 दिवसात ठराविक संख्येने पूर्ण करा.
हे रत्न धारण करा
बुध ग्रह अनुकूल बनवण्यासाठी आणि करिअरमध्ये नवीन उंची गाठण्यासाठी, बुध प्रदोषाच्या दिवशी बुध रत्न पन्ना धारण करणे सर्वात शुभ आहे. असे मानले जाते की पन्ना धारण केल्याने नाव आणि कीर्ती मिळते, तसेच पत्रिकेतून बुध ग्रहाचे सर्व अशुभ प्रभाव दूर होतात.
या वस्तूंचे दान करा
बुध प्रदोषाच्या शुभ मुहूर्तावर बुध ग्रहाशी संबंधित वस्तूंचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते आणि असे केल्याने शिवाच्या आशीर्वादासह बुध ग्रहही तुमच्या पत्रिकेत बलवान होतो. बुध प्रदोषाच्या दिवशी हिरव्या भाज्या, सोललेली हरभऱ्याची डाळ दान करा किंवा गायीला खाऊ घाला. असे केल्याने तुम्हाला आत्मसमाधान मिळेल आणि शिवाचा आशीर्वादही प्राप्त होईल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)