बुधवारच्या दिवशी करा ‘हे’ आठ उपाय, श्रीगणेशाच्या कृपेने मिळेल सुख-समृद्धी
बुधवारचा दिवस हा श्रीगणेशाच्या उपासनेचा दिवस मानला जातो. या दिवशी केलेल्या काही उपायांमुळे आर्थिक चणचण दूर होते.
मुंबई, बुधवार हा दिवस गणपतीचा प्रिय दिवस मानला जातो. कोणत्याही पूजेत आणि शुभ कार्यात श्रीगणेशाच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरवात गणपती पूजनापासूनच होते. बुधवारी उपवास (Budhwar Upay) ठेवण्याबरोबरच गणपतीची पूजा करण्याला महत्त्व आहे. असे मानले जाते की, जी व्यक्ती या दिवशी गणपतीची आराधना करते, बाप्पा त्याचे सर्व संकट दूर करतात आणि सर्व मनोकामना पूर्ण करतात. याशिवाय या दिवशी काही ज्योतिषीय उपाय केल्यास व्यवसाय आणि नोकरीत भरपूर यश मिळते. याशिवाय जीवनात अर्थी स्थैर्यदेखील लाभते. जाणून घेऊया बुधवारी कोणते उपाय करणे शुभ आहे.
बुधवारचे उपाय
- बुधवारी गणेश मंदिरात जाऊन गणेशजींना गूळ अर्पण करा. असे केल्याने गणपतीसोबत माता लक्ष्मीही प्रसन्न राहते, यामुळे घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासणार नाही.
- या दिवशी गणपतीच्या पूजेच्या वेळी 21 दुर्वा अवश्य अर्पण कराव्यात. असे केल्याने बाप्पा लवकर प्रसन्न होतात.
- बुधवारी गायीला हिरवे गवत खायला द्यावे. यामुळे आर्थिक प्रगतीसोबतच देवाची कृपा प्राप्त होईल आणि जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळेल.
- बुधवारी दुर्गा मातेची पूजा करावी. याशिवाय ‘ओम ऐं हरी क्लीं चामुंडयै विचारे’ या मंत्राचा नियमित 108 वेळा जप करावा , बुध दोषापासून मुक्ती मिळेल.
- या दिवशी श्रीगणेशाला शेंदूर वाहावे. यामुळे तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल.
- बुधवारी करंगळीमध्ये पाचू घाला. असे केल्याने कुंडलीत बुधाची स्थिती कमकुवत असेल तर ती मजबूत होते. परिधान करण्यापूर्वी ज्योतिषाचा सल्ला घ्या.
- बुधवारी ‘ओम गं गणपतये नमः’ किंवा ‘श्री गणेशाय नमः’ या मंत्राचा जप करा, यामुळे तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतील.
- जर तुमच्या कुंडलीत बुध ग्रह कमजोर असेल तर बुधवारी हिरवा मूग किंवा हिरवे कापड एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा, तुम्हाला त्याचा फायदा होईल.
हे सुद्धा वाचा
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)