Budhwar Upay: नोकरी किंवा व्यावसात येत असतील समस्या, तर बुधवारच्या दिवशी हे उपाय नक्की करा
असे मानले जाते की, जिथे विघ्नांचा नाश करणारा श्री गणेश वास करतो, तिथे रिद्धी-सिद्धी, शुभ-लाभ आणि माता लक्ष्मीचा वास असतो.
मुंबई, बुधवार (Budhwar Upay) हा श्री गणेशाला समर्पित मानला जातो. श्री गणेशाला आद्य पूजनीय देवता मानले जाते. श्रीगणेशाचे नामस्मरण करून सुरू केलेले कोणतेही काम कधीही बिघडत नाही, असे म्हणतात. बुधवारी बाधा दूर करणाऱ्या श्रीगणेशाची आराधना केल्याने जीवनात आनंद मिळतो. हा दिवस शुभ कामे करण्यासाठी योग्य आहे. असे मानले जाते की, जिथे विघ्नांचा नाश करणारा श्री गणेश वास करतो, तिथे रिद्धी-सिद्धी, शुभ-लाभ आणि माता लक्ष्मीचा वास असतो. त्याच्या कृपेने सर्व काही शुभ होते. गणेशाची पूजा केल्याने बुद्धी तीक्ष्ण होते. याशिवाय बुधवारी काही उपाय केल्याने विघ्नहर्ता गणेशाची कृपा प्राप्त होते. चला तर मग जाणून घेऊया बुधवारी गणपतीची कृपा प्राप्त करण्यासाठी कोणते उपाय करावेत.
गाईला हिरवे गवत खायला द्यावे
घराच्या आर्थिक समस्येवर मात करण्यासाठी बुधवारी गाईला हिरवा गवताचा चारा खाऊ घाला. यासोबतच गणेशाच्या मंदिरात जाऊन त्यांना दुर्वा अर्पण करा.
लाडू दान करा
ज्योतिष शास्त्रानुसार बुधवारी पितळेच्या ताटावर चंदनाने ‘ओम गं गणपतये नमः’ लिहा आणि त्यात पाच लाडू मंदिरात दान करा. असे मानले जाते की असे केल्याने कुंडलीत धनप्राप्तीची शक्यता निर्माण होते.
बुध मजबूत करण्याचे मार्ग
जर तुमचा बुध कमजोर असेल तर नेहमी हिरवा रुमाल सोबत ठेवा. तसेच बुधवारी हिरवी मूग डाळ किंवा हिरवे कपडे गरजूंना दान करा. याशिवाय या दिवशी हिरवे कपडे घालणे शुभ असते.
सिंदूर टिळक
बुधवारी पूजा करताना श्रीगणेशाच्या कपाळावर सिंदूर टिळक लावा. यानंतर, ते आपल्या कपाळावर देखील लावा. त्यामुळे कामात यश मिळेल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)