Budhwar Upay: बुधवारी केलेल्या या सोप्या उपायांमुळे होते सर्व दुःखाचे निवारण, लाभतो गणरायाचा आशिर्वाद
आज आपण बुधवारी केल्या जाणाऱ्या 7 सोप्या उपायांबद्दल माहिती जाणून घेउया.
मुंबई, हिंदू धर्मात, आठवड्याचे सर्व सात दिवस वेगवेगळ्या देवी देवतांना समर्पित आहेत आणि आज बुधवार आहे, आजचा दिवस भगवान गणेशाला समर्पित आहे. बुधवारी (Budhwar Upay) विधीपूर्वक गणेशाची पूजा केली जाते आणि असे मानले जाते की बाप्पा प्रसन्न झाल्यास ते भक्तांवर विशेष कृपा करतात. ज्यानंतर तुमच्या आयुष्यात कधीही संपत्तीची कमतरता भासत नाही. बुधवारी तुम्ही काही विशेष उपाय देखील करा ज्यामुळे श्री गणेश प्रसन्न होतील. आज आपण बुधवारी केल्या जाणाऱ्या 7 सोप्या उपायांबद्दल माहिती जाणून घेउया.
करा हे सोपे उपाय
हे सुद्धा वाचा
- श्रीगणेशाला प्रसन्न करण्यासाठी बुधवारी उपवासही केला जातो. जर तुम्हीही उपवास करत असाल तर लक्षात ठेवा की, सकाळी लवकर उठल्यानंतर स्नान वगैरे करून गणेशाची पूजा करावी.
- श्रीगणेशाची आराधना करताना त्यांना दुर्वा अवश्य अर्पण करा. हे अत्यंत शुभ मानले जाते.
- बुधवारी गायीला हिरवा चारा खाऊ घालणे देखील खूप शुभ आणि लाभदायक मानले जाते. म्हणूनच या दिवशी गाईला हिरवा चारा खायला द्या.
- बुधवारी, मूग डाळ पंजिरी किंवा हलवा याचा नैवेद्य दाखविला जातो आणि त्याचे प्रसाद म्हणून वाटप केले जाते. यानंतर संध्याकाळी उपवास हा प्रसाद घेऊन उपवास सोडल्या जातो.
- बुधवारी श्रीगणेशाची पूजा केल्यानंतर गणेश चालीसा पाठ करा, तरच पूजा पूर्ण मानली जाते.
- बुधवारी गणेशाला सिंदूर अर्पण करा. असे केल्याने जीवनातील सर्व समस्या संपतात.
- गणेशाच्या मंदिरात 7 बुधवारपर्यंत गुळाचा नैवेद्य दाखवावा.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)