Budhwar Upay: बुधवारी केलेल्या ‘या’ उपायांनी दूर होते रोग आणि दारिद्र्य, श्रीगणेशाची राहते कृपा
सतत पैशांची चणचण किंवा दीर्घकाळापासून आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीने बुधवारच्या दिवशी केलेल्या काही उपायांमुळे फायदा होतो.
मुंबई, गणपती हे सर्व देवतांमध्ये प्रथम पूजनीय मानले जातात. त्याचे ध्यान केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात. बुधवार (Budhwar Upay) हा गणपतीला समर्पित आहे. या दिवशी श्रीगणेशाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी भक्त विविध उपाय करतात. असे मानले जाते की बुधवारी केलेल्या उपायांनी गणपती लवकर प्रसन्न होतो आणि भक्तांचे सर्व अडथळे दूर करतो. बुधवारी केलेल्या उपायांनी रोग आणि दारिद्र्य दूर होते. या उपायांबद्दल जाणून घेऊया.
बुधवारच्या दिवशी करा हे सोपे उपाय
- सकाळी लवकर उठून स्नान करून श्रीगणेशाची पूजा करावी. गणेशाच्या मंदिरात 11 किंवा 21 दुर्वांची जोड अर्पण केल्यास विशेष लाभ होतो. कोणत्याही कामात वारंवार अपयश येत असेल तर बुधवारपासून गणेशाच्या मंत्राचा जप सुरू करा.
- बुधवारी श्री गणेशाची विधिवत पूजा केल्यानंतर त्याला गूळ आणि तूप अर्पण करावे. हा भोग काही वेळाने गायीला खायला द्यावा, विशेष फळ मिळते. घरामध्ये पांढऱ्या रंगाची गणेशमूर्ती स्थापित करणे खूप शुभ मानले जाते.
- बुधवारी गणपतीला मोदक प्रसाद अर्पण केल्याने घरात शांती राहते आणि सुख-समृद्धी येते. या दिवशी गणेशाला शमीची पाने अर्पण केल्याने बुद्धी तीक्ष्ण होते आणि ग्रहांचे कलह नष्ट होतात.
- बुधवारी गणेशाला शेंदूर अर्पण करावे. गरिबी, संकट दूर होऊन घरात समृद्धी येते. बुधवारी गरजूंना हिरवी मूग दान केल्याने नात्यातील कटुता दूर होते.
- जर तुमचा राहु कमजोर असेल तर डोक्याजवळ एक नारळ ठेवा आणि बुधवारी रात्री झोपा आणि दुसऱ्या दिवशी ते नारळ गणेश मंदिरात अर्पण करा. यासोबत विघ्नहर्ता गणेश स्रोत पठण करावे. याचा परिणाम राहूवर होत नाही.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)