त्वचे संबंधी रोग, व्यवसायात नुकसान, या समस्यांपासून बचावासाठी बुधवारचा उपवास ठेवा, जाणून घ्या याबाबत सर्व माहिती

बुधवारचा दिवस हा श्री गणेशाला समर्पित असतो (Lord Ganesha). भगवान गणेशाला बुद्धी देणारा आणि शुभ देव प्रदान करणारे देव मानले जाते. बुधवारच्या उपवासाने घरातील सर्व आपत्ती दूर होतात आणि सुख-शांती नांदते.

त्वचे संबंधी रोग, व्यवसायात नुकसान, या समस्यांपासून बचावासाठी बुधवारचा उपवास ठेवा, जाणून घ्या याबाबत सर्व माहिती
Lord Ganesha
Follow us
| Updated on: May 12, 2021 | 2:43 PM

मुंबई : बुधवारचा दिवस हा श्री गणेशाला समर्पित असतो (Lord Ganesha). भगवान गणेशाला बुद्धी देणारा आणि शुभ देव प्रदान करणारे देव मानले जाते. बुधवारच्या उपवासाने घरातील सर्व आपत्ती दूर होतात आणि सुख-शांती नांदते. या दिवशी गणेशाच्या पूजेबरोबरच बुद्ध देवाचीही पूजा केली जाते (Budhwar Vrat For Skin Problems And Loss In Business Know When To Start).

आपल्याला त्वचेचा कोणताही आजार असल्यास, व्यवसायात तोटा झाला असेल तर कर्जामुळे त्रस्त असल्या किंवा घरी वारंवार त्रास होत असेल तर आपण बुधवारी उपवास करावा. अशा वेळी हा उपवास अतिशय फलदायी मानला जातो. या उपवासाशी संबंधित सर्व महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या.

या व्रताची सुरुवात कधीपासून करावी?

बुधवारचा व्रत कुठल्याही महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या बुधवारपासून सुरु केला जाऊ शकतो, परंतु विशाखा नक्षत्राच्या बुधवारपासून या उपवासाला सुरुवात करणे अत्यंत शुभ मानले जाते. अग्निपुराणमध्ये विशाखा नक्षत्रापासून बुधवारच्या उपवासाला सुरुवात करण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय, एकदा आपण उपवास सुरु केल्यानंतर किमान सात उपवास पाळावेत. जर समस्या अधिक गंभीर असेल तर 21 किंवा 24 बुधवारपर्यंत उपवास ठेवा. शेवटच्या उपवासाच्या दिवशी उद्यापन करा.

पूजा कशी करावी?

स्नान करुन मंदिरात बुधवारी यंत्र स्थापित करा. यानंतर गणेशाचे स्मरण करा आणि बुधवारी किती उपवास ठेवायचे आहेत त्याचा संकल्प घ्या. यानंतर गणेशाची पूजा करावी. पूजे दरम्यान त्यांना रोली, अक्षत, दीपक, धूप, दक्षिणा इत्यादी अर्पण करा. त्यांना लाडू किंवा मूग डाळीचा शिरा अर्पण करा. बुधदेवचे स्मरण करुन बुध यंत्राचे पूजन करा. बुध यंत्रावर जल आणि हिरवी वेलची, रोली, अक्षता, फुले इत्यादी अर्पण करा. यानंतर बुधवारच्या उपवासाची कथा वाचा आणि आरती करा.

हे देखील लक्षात ठेवा

बुधवारच्या उपवासादरम्यान मीठाचं सेवन करु नये. दिवसा फळाहार घ्या आणि संध्याकाळी जेवण करा. याशिवाय संध्याकाळी प्रसाद खाल्यावरच उपवास सोडा, त्यानंतर जेवण करा. उपवासाच्या दिवशी आपल्या क्षमतेनुसार हिरवी मूग डाळ, हिरव्या भाज्या, हिरवे कपडे किंवा हिरव्या कोणत्याही वस्तू गरीब किंवा गरजूंना दान करा. कोणालाही फसवू नका किंवा कोणाविषयी निंदनीय शब्द बोलू नका.

Budhwar Vrat For Skin Problems And Loss In Business Know When To Start

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Akshaya Tritiya 2021 : अक्षय तृतीयेला ‘या’ शुभ गोष्टी खरेदी करा, देवी लक्ष्मी प्रसन्न होईल

Akshaya Tritiya 2021 | अक्षय तृतीयेच्या दिवशी चुकूनही ही कामं करु नये, जाणून घ्या या दिवसाचं महत्व

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.