Budwar Upay : नोकरीत करत असाल समस्यांचा सामना तर बुधवारी अवश्य करा हे उपाय
ज्यांच्यावर गणपतीची कृपा असते संकटे त्यांच्यापासून दूर राहतात. तसेच श्रीगणेशाची पूजा केल्यावरच कोणत्याही शुभ कार्याची सुरूवात होते.
मुंबई : बुधवार हा प्रथम पूजनीय श्री गणेशाला समर्पित आहे. गणपतीला विघ्नहर्ता असेही म्हणतात, त्यांच्या आशीर्वादाने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. संततीप्राप्तीसाठी, यशासाठी आणि मुलांच्या सुरक्षिततेसाठी गणेशाची उपासना फलदायी मानली जाते. ज्यांच्यावर गणपतीची कृपा असते संकटे त्यांच्यापासून दूर राहतात. तसेच श्रीगणेशाची पूजा केल्यावरच कोणत्याही शुभ कार्याची सुरूवात होते. शास्त्रामध्ये बुधवारी (Budhwar Upay) काही विशेष उपाय सांगण्यात आले आहेत ज्यामुळे घरात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य नांदते. चला तर मग बुधवारचे उपाय जाणून घेऊया.
व्यवसायात प्रगतीसाठी
गणपतीला प्रसन्न करण्यासाठी बुधवारी गणेशाला 21 दुर्वांचे जोड अर्पण करा. यामुळे नोकरी-व्यवसायातील अडथळे दूर होतील आणि प्रगतीचा मार्ग खुला होईल. दुर्वा अर्पण केल्यानंतर ओम गं गणपतये नमः चा जप करा.
मुलांच्या अभ्यासात एकाग्रता आणण्यासाठी
श्री गणेश बुद्धीचा देवता आहे. असे म्हटले जाते की बुधवारी श्री गणेशाला शेंदूर अर्पण केल्याने मुलांचा बौद्धिक विकास होतो. याशिवाय मुलांची चिडचिडही दूर होते. मुलांची अभ्यासाची ओढ वाढते. शास्त्रानुसार जर कुंडलीत राहु-केतूचा नकारात्मक प्रभाव असेल तर मुलामध्ये खोटे बोलण्याची प्रवृत्ती वाढते आणि मन अभ्यासातून भटकायला लागते, परंतु दर बुधवारी गणेशाला शेंदूर अर्पण केल्यास दुष्परिणामांना सामोरे जावे लागत नाही.
आर्थिक आवक वाढण्यासाठी
तृतीयपंथीयांना हिरवे कपडे दान करणे आणि बुधवारी गायींना हिरवे गवत खाऊ घालणे शुभ मानले जाते. त्यामुळे आर्थिक प्रगती होते. कुंडलीत बुध बलवान होतो, त्यामुळे निर्णय क्षमता आणि आत्मविश्वास वाढतो.
मानसिक तणावापासून मुक्तीसाठी
बुधवारी ओम बम बुधाय नमःचा जप केल्याने साधकाला मानसिक तणावापासून मुक्ती मिळते. बुध ग्रहाच्या या मंत्रांचा जप केल्याने मनाची एकाग्रता वाढते. या दिवशी तुम्ही हिरवी मूग डाळही दान करू शकता.
प्रत्येक क्षेत्रात यशासाठी
शास्त्रात बुधवारचा दिवस बहीण आणि भाचीच्या नावाने सांगितला आहे. बुधवारी बहीण आणि भाचीला भेटवस्तू दिल्याने व्यवसाय, शिक्षणात प्रगती होते आणि कुंडलीतील बुधाच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळते. कौटुंबिक संबंध कधीच खराब होत नाहीत.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)