Falgun Amavashya 2023 : नोकरी-व्यावसायात होत नसेल प्रगती तर फाल्गुन अमावस्येच्या दिवशी करा हे विशेष उपाय

यावेळी ही चैत्र अमावस्या 21 मार्चला असेल. ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की या दिवशी 4 उपाय केल्याने जीवनात समृद्धी येते आणि कुटुंबात सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो.

Falgun Amavashya 2023 : नोकरी-व्यावसायात होत नसेल प्रगती तर फाल्गुन अमावस्येच्या दिवशी करा हे विशेष उपाय
अमावस्याImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Mar 18, 2023 | 12:11 PM

मुंबई : फाल्गुन  अमावास्येला (Amavashya 2023) सनातन धर्मात फार महत्त्व  जाते. याला भूतडी किंवा भूमवती अमावस्या असेही म्हणतात. या दिवशी गंगा किंवा इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने सर्व पापे धुतली जातात अशी मान्यता आहे. या दिवशी दान करण्याला सुद्धा खूप महत्व आहे . असे केल्याने व्यवसायात प्रगती होते आणि नोकरीत चांगल्या संधी उपलब्ध होतात. यावेळी ही फाल्गुन अमावस्या 21 मार्चला असेल. ज्योतिष शास्त्रात असे म्हटले आहे की या दिवशी 4 उपाय केल्याने जीवनात समृद्धी येते आणि कुटुंबात सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो. ते उपाय काय आहेत ते जाणून घेऊया.

संतती सुख प्राप्त करण्यासाठी

लग्नाला बराच काळ लोटल्यानंतरही ज्यांना संतती सुखाची आस आहे त्यांनी फाल्गुन अमावस्येला पिंपळाच्या झाडाच्या मुळाला पाणी, काळे तीळ, दूध आणि जव एकत्र करून अर्पण करावे. यानंतर पिंपळाच्या झाडाची 7 वेळा प्रदक्षिणा करावी. संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. असे केल्याने संतती सुखाची शक्यता निर्माण होते.

मंगळ दोष दूर होतो

जर तुम्ही मंगल दोषाने त्रस्त असाल तर भौमवती अमावस्येला मंगल बीज मंत्र ‘ओम क्रां क्रौंं सह भौमाय नमः’ चा 108 वेळा जप करा. यासोबतच कस्तुरी, गूळ, तूप, लाल मसूर, कुंकू, प्रवाळ, सोने, तांब्याची भांडी आणि लाल कपडे गरजूंना दान करा. असे म्हणतात की हा उपाय केल्याने जीवनात मंगल दोषापासून मुक्ती मिळते.

हे सुद्धा वाचा

नोकरी-व्यवसायात प्रगती

खूप प्रयत्न करूनही नोकरी-व्यवसायात योग्य प्रगती होत नसलेल्या अशा लोकांना फाल्गुन अमावस्येला उपाय करता येतील. यासाठी फाल्गुन अमावस्येच्या दिवशी हनुमानजींना नवीन लाल रंगाचे वस्त्र अर्पण करून रामरक्षा पठण करावे. या दिवशी तांदूळ, दूध आणि कपडे दान करणे खूप शुभ मानले जाते. असे म्हणतात की या उपायाने पितरांची नाराजी दूर होते आणि सर्व अडकलेली कामे पूर्ण होतात.

पितृदोषापासून मुक्ती

ज्या लोकांना पितृदोष आहे त्यांनी फाल्गुन अमावस्येच्या दिवशी पितरांची पूजा करून त्यांना प्रसन्न करावे. या दिवशी काळे तीळ दान केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि पितृदोष दूर होतो असे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे. हा उपाय केल्याने कुटुंबात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि आर्थिक बळ येते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.