Chaitra Ekadashi: चैत्र महिन्यातील एकादशीचे कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त….
Chaitra Ekadashi 2025: हिंदू धर्मात, एकादशी ही तिथी भगवान विष्णूंना समर्पित आहे. या दिवशी लोक विधीनुसार भगवान हरि विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करतात. धार्मिक श्रद्धेनुसार, या दिवशी पूजा आणि उपवास केल्याने जीवनात सुख आणि समृद्धी राहते.

हिंदू धर्मामध्ये चैत्र महिन्याला विशेष महत्त्व दिले जाते. त्याचो मुख्य कारण म्हणजे प्रत्येकवर्षी हिंदू नववर्ष चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून सुरू होतो. मान्यतेनुसार, असे म्हटले जाते की ब्रम्हदेवानी चैत्र महिन्यामध्ये या विश्वाची निर्मिती केली होती. अशा परिस्थितीमध्ये या महिन्यामध्ये येणाऱ्या उपवासांचे, सणांचे आणि सुभ कार्याला विशेष महत्त्व दिले जाते. मान्यतेनुसार, या महिन्यामध्ये येणाऱ्या सर्व तिथींचे देखील विशेष महत्त्व आहे. या दिवसांमध्ये आपल्या जगाचे रक्षक विष्णू भगवान यांची प्रसन्न मनानी पूजा केली जाते. एकादशी महिन्यामध्ये दोन वेळा साजरा केली जाते. या एकादशीच्या दिवशी विष्णू भगवानची पूजा केली जाते.
तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती होत नहीये आणि सारखे सारखे कामामध्ये अडथळे येत असतील तर तुम्ही एकादशीचे उपवास करणे फायदेशीर ठरते. एकादशीची पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात आणि तुमच्या जीवनामध्ये तुमची प्रगती होते. या दिवशी पूजा केल्यामुळे तुम्हाला विष्णू भगवान आणि देवी लक्ष्मीचा आशिर्वाद तुम्हाला प्राप्त होतो. त्यांचे आशिर्वाद मिळाल्यास तुमचे मन सकारात्मक होते. चला जाणून घेऊया चैत्र महिन्यातील एकादशीचे व्रत कधी पाळले जाणार.
पापमोचनी एकादशी 2025 ….
पंचांगानुसार, चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला पापमोचनी एकादशी म्हणतात. ही तारीख 25 मार्च रोजी सकाळी 5:05 वाजता सुरू होईल आणि 26 मार्च रोजी पहाटे 3:45 वाजता संपेल. उदय तिथीनुसार, पापमोचनी एकादशीचे व्रत मंगळवार, 25 मार्च रोजी पाळले जाईल. एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो. पापमोचनी एकादशीचा उपवास सोडण्याची वेळ दुपारी 1:41 ते 4:08 पर्यंत असेल. या काळात, उपवास करणारा व्यक्ती विधीनुसार पूजा करून आपला उपवास सोडू शकतो.
कामदा एकादशी 2025 …..
हिंदू कॅलेंडरनुसार, चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला कामदा एकादशी म्हणून ओळखले जाते. ही तारीख 7 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता सुरू होईल. ही तारीख 8 एप्रिल रोजी रात्री 9:12 वाजता संपेल. उदय तिथीनुसार, कामदा एकादशीचे व्रत मंगळवार, 8 एप्रिल रोजी पाळले जाईल. पंचांगानुसार, कामदा एकादशीचा व्रत सोडण्याची वेळ सकाळी 6:02 ते 8:34 पर्यंत असेल. या काळात, भक्त भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करून उपवास सोडू शकतात.