Chaitra Navratra : कधीपासून सुरू होत आहे चैत्र नवरात्र? जाणून घ्या महत्व
यंदा 22 मार्च 2023 बुधवार रोजी चैत्र नवरात्रीला सुरुवात होत आहे. तर 30 मार्च गुरुवार रोजी चैत्र नवरात्री समाप्त होवुन, श्रीराम नवमीला सुरुवात होत आहे.
मुंबई : हिंदू धर्मात स्त्री शक्तीच्या जागराला विषेश महत्त्व देण्यात आले आहे. म्हणूनच शक्तीच्या उपासनेचा सण नवरात्र वर्षातून चार वेळा साजरा करण्यात येतो. पहिली वासंतिक नवरात्र पहिल्या चैत्र महिन्यात येते , दुसरी नवरात्र आषाढ महिन्यात, तिसरी अश्विन महिन्यात म्हणजे शारदीय नवरात्री आणि चौथी नवरात्र अकराव्या महिन्यात म्हणजेच माघ महिन्यात येते . यापैकी माघ महिन्यात येणाऱ्या नवरात्रीला माघ गुप्त नवरात्र आणि आषाढ महिन्यात येणाऱ्या नवरात्रीला आषाढ गुप्त नवरात्र म्हणतात. नवरात्रीच्या नऊ दिवशी देवीच्या (Chaitra Navratri 2023) नऊ रुपांची पूजा केली जाते. या दरम्यान भक्त विधीवत देवी दुर्गाची पूजा करतात. तर काही लोकं या नऊ दिवसांदरम्यान उपवास ठेवतात. हिंदू पंचांगांनुसार, चैत्र महिन्याची सुरुवात झाली आहे. या महिन्यात चैत्र नवरात्रीचा (Chaitra Navratri) उत्सव साजरा केला जातो.
कधी सुरु होईल नवरात्री
यंदा 22 मार्च 2023 बुधवार रोजी चैत्र नवरात्रीला सुरुवात होत आहे. तर 30 मार्च गुरुवार रोजी चैत्र नवरात्री समाप्त होवुन, श्रीराम नवमीला सुरुवात होत आहे. यावेळी चैत्र नवरात्रीला ग्रह आणि नक्षत्रांचा दुर्मिळ संयोग होत आहे. चैत्र नवरात्रीमध्ये शनि आणि मंगळ मकर राशीत राहतील. मकर राशीत शनि-मंगळ युती, शनीची राशी, तुमची शक्ती वाढवेल. या शिवाय या 9 दिवसांमध्ये रवि पुष्य नक्षत्र, सर्वार्थ सिद्धी योग, रवि योग देखील तयार होतील, ज्यामुळे नवरात्रीची शुभता आणखी वाढेल.
9 दिवस मातेच्या रूपांची पूजा :
- चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस (22 मार्च 2023) – प्रतिपदा तिथी, आई शैलपुत्रीची पूजा आणि घटस्थापना.
- चैत्र नवरात्रीचा दुसरा दिवस (23 मार्च 2023) – द्वितीया तिथी, माँ ब्रह्मचारिणी पूजा
- चैत्र नवरात्री तिसरा दिवस (24 मार्च 2023) – तृतीया तिथी, माँ चंद्रघंटा पूजा
- चैत्र नवरात्रीचा चौथा दिवस (25 मार्च 2023) – चतुर्थी पूजा तिथी, माँ चतुर्थी
- नवरात्री पाचवा दिवस (26 मार्च 2023) – पंचमी तिथी, माँ स्कंदमाता पूजा
- चैत्र नवरात्रीचा सहावा दिवस (27 मार्च 2023) – षष्ठी तिथी, मां कात्यायनी पूजा
- चैत्र नवरात्रीचा सातवा दिवस (28 मार्च 2023) – सप्तमी तिथी, माँ स्कंदमाता पूजा चैत्र
- नवरात्री चा कालरात्री दिवस (29 मार्च 2023) – अष्टमी तिथी, माँ महागौरी पूजा, महाष्टमी चैत्र नवरात्रीचा
- नववा दिवस (30 मार्च 2023) – नवमी तिथी, माँ सिद्धिदात्री पूजा, दुर्गा महानवमी.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)