Chaitra Navratri 2021 | आज चैत्र नवरात्रीचा सातवा दिवस, जाणून घ्या देवी काळरात्रीची पौराणिक कथा, महत्व आणि पूजा विधी
चैत्र नवरात्रीचा नऊ दिवसांचा उत्सव 13 एप्रिलपासून सुरु झाला आहे (Chaitra Navratri 2021). 22 एप्रिलला याची समाप्ती होईल. या शुभ उत्सवावर भक्त देवी दुर्गाच्या नऊ रुपांची पूजा केली जाते.
मुंबई : चैत्र नवरात्रीचा नऊ दिवसांचा उत्सव 13 एप्रिलपासून सुरु झाला आहे (Chaitra Navratri 2021). 22 एप्रिलला याची समाप्ती होईल. या शुभ उत्सवावर भक्त देवी दुर्गाच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. नवरात्रीच्या 7 व्या दिवशी भक्त देवी काळरात्रीची पूजा केली जाते. देवी दुर्गाच्या सातव्या रुपाची देवी काळरात्रीची पूजा केली जाते. देवी काळरात्री देवी दुर्गाच्या विनाशकारी अवतारांपैकी एक रुप म्हणून मानलं जातं, त्यांचं वाहन गाढव आहे (Chaitra Navratri 2021 Day 7 Devi Kaalratri Story And Puja Vidhi).
चित्रानुसार, देवी काळरात्रीच्या त्वचेचा रंग सावळा असतो आणि त्यांना तिसरं नेत्र आहे. त्यांचे चार हात आहेत. एका हातात अभय मुद्रा धारण करतात, दुसऱ्या हातात त्या वर मुद्रा धारण करतात. आपल्या तिसऱ्या आणि चौथ्या हातात त्या एक वज्र आणि एक तलवार धारण करतात.
देवी काळरात्रीची पूजा कशी करावी?
या शुभ दिवशी भाविकांनी लवकर उठून स्नान करावं. त्यानंतर भगवान गणेशाची पूजा करावी, त्यानंतर देवी काळरात्रीच्या मूर्तीची पूजा करावी.
या दिवशी देवी काळरात्रीला प्रसन्न करण्यासाठी या मंत्रांचा जप करा-
या देवी सर्वभूतेषु मां कालरात्रि रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
एकवेनी जपकर्णपुरा नग्ना खरास्थिता। लम्बोष्ठी कार्णिकारिणी तिलभ्यक्त शरीरिनी।।
वामापदोलासलोहा लताकांतभूषण। वर्धन मुर्धवाजा कृष्ण कालरात्रिर्भयंकरी।।
देवी काळरात्रीचा इतिहास
हिंदू पौराणिक कथांनुसार, देवी पार्वतीने राक्षस, शुम्भ-निशुंभ आणि रक्तबीजला मारण्यासाठी देवी काळरात्रीचा अवतार घेतला होता. भयंकर अवतार घेऊन त्यांनी तिघांचा वध केला. जेव्हा रक्तबीजचा वध केला तेव्हा त्याच्या रक्ताने आणखी रक्तबीज जन्माला आले आणि त्याला थांबवण्यासाठी देवी काळरात्रीने त्याचं सर्व रक्त पिलं जेणेकरुन त्याचा वध केला जाऊ शकेल.
नवरात्रीच्या नऊ दिवसांपर्यंत जर तुम्ही देवीच्या या नऊ स्वरुपांची पूजा करतात तेव्हा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. या नऊ दिवसांमध्ये महिला आणि कन्या देवीची उपासना करण्यासाठी व्रत ठेवतात जेणेकरुन त्यांच्या इच्छा पूर्ण व्हाव्या.
Lakshmi Panchami 2021 | लक्ष्मी पंचमीच्या दिवशी या प्रकारे करा पूजा, देवी लक्ष्मी प्रसन्न होईल…https://t.co/zpVjSSmdRA#LakshmiPanchami2021
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 17, 2021
Chaitra Navratri 2021 Day 7 Devi Kaalratri Story And Puja Vidhi
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Chaitra Navratri 2021 | चैत्र नवरात्रीचा पाचवा दिवस, देवी स्कंदमाताची पूजा विधी, आरती आणि महत्त्व…