Chaitra Navratri 2021 | घट स्थापनेच्या दिवशी शुभ योग, हे उपाय करा, कौटुंबिक आणि आर्थिक समस्या सुटतील

चैत्र नवरात्री आता काहीच दिवसांवर येऊन ठेपली आहे (Chaitra Navratri 2021). या वर्षी चैत्र नवरात्री 13 एप्रिलपासून सुरु होणार आहे तर नवमी तिथी 21 एप्रिलला असेल.

Chaitra Navratri 2021 | घट स्थापनेच्या दिवशी शुभ योग, हे उपाय करा, कौटुंबिक आणि आर्थिक समस्या सुटतील
Chaitra Navratri
Follow us
| Updated on: Apr 05, 2021 | 12:35 PM

मुंबई : चैत्र नवरात्री आता काहीच दिवसांवर येऊन ठेपली आहे (Chaitra Navratri 2021). या वर्षी चैत्र नवरात्री 13 एप्रिलपासून सुरु होणार आहे तर नवमी तिथी 21 एप्रिलला असेल. या नऊ दिवसांमध्ये देवी दुर्गाच्या नऊ वेगवेगळ्या स्वरुपांची पूजा केली जाते. अनेकजण नवरात्रीदरम्याव नऊ दिवसांचा उपवास देखील ठेवतात आणि देवीच्या नऊ स्वरुपांची पूजा करतात (Chaitra Navratri 2021 Importance Shubh Muhurt For Ghat Sthapna And Upay For Your Problems).

हिंदू धर्मात नवरात्रीचं विशेष महत्व आहे. वर्षभरात एकूण चार नवरात्र येतात. यापैकी दोन गुप्त नवरात्र असतात ज्या आषाढ आणि माघ महिन्यात येतात. तर इतर दोन शारदीय आणि चैत्र महिन्यात साजरी केली जाते.

हिंदू पंचांगानुसार, चैत्र महिन्याची सुरुवात झाली आहे. या महिन्यात चैत्र नवरात्रीचा सण साजरा केला जातो. जला जाणून घेऊ नवरात्री पहिल्या दिवसाबाबतच्या काही खास गोष्टी –

घट स्थापनेच्या दिवशी शुभ संयोग

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी भाविक घट स्थापना म्हणजेच कलश स्थापना करतात. नऊ दिवस विधीवत या कलशाची पूजा केली जाते. यंदा बार नवरात्रीच्या पहिल्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग बनतो आहे. प्रतिपदेच्या तिथीला विष्कुंभ आणि प्रीती योग बनतो आहे. या दिवशी विष्कुंभ योग दुपारी 3 वाजून 6 मिनिटांपर्यंत असेल तर प्रीती योगची सुरुावत सकाळी 10 वाजून 17 मिनिटांना होईल.

घट स्थापनेचा शुभ मुहूर्त

घट स्थापनेचा शुभ मुहूर्त 13 एप्रिल 2021 ला मंगळवारी सकाली 5 वाजून 28 मिनिटांपासून ते 19 वाजून 14 मिनिटांपर्यंत असेल.

दुसरा शुभ मुहूर्त – 11 वाजून 56 मिनिटांपासून ते दुपारी 12 वाजून 47 मिनिटांपर्यंत असेल.

नवरात्रीच्या दिवशी कलश स्थापित केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. याद्वारे देवी दुर्गाची कृपा तुमच्यावर रहाते आणि तुम्हाला शुभ फळ मिळतात.

नवरात्रीत हे उपाय करा –

नवरात्रीची पूजा केल्याने घरात आनंद आणि समृद्धी नांदते. नवरात्री दरम्यान, अनेक लोक त्यांच्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी विविध उपाययोजना करतात. जर आपल्याला आर्थिक अडचण असेल तर घरात उत्तर दिशेने बसून लाल रंगाच्या तांदळाच्या ढिगावर श्रीयंत्र ठेवा. श्रीयंत्रासमोर तुपाचे नऊ दिवे लावून पूजा करा आणि नंतर मंदिरात श्रीयंत्राची स्थापना करा. उर्वरित पूजा सामग्री वाहत्या पाण्यात प्रवाहित करा.

जर तुम्हाला कौटुंबिक समस्या असेल, तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी ‘सब नर करहिं परस्पर प्रीति चलहिं स्वधर्म निरत श्रुति नीति’चा जप करावा आणि अग्नीत तुपाने 108 वेळा आहुती द्या. असे केल्याने परस्पर कलह दूर होईल. घरातील सदस्यांमध्ये प्रेम वाढेल.

Chaitra Navratri 2021 Importance Shubh Muhurt For Ghat Sthapna And Upay For Your Problems

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Sheetala Ashtami 2021 | कुटुंबाच्या आरोग्यासाठी आणि आर्थिक संकट दूर करण्यासाठी करा शीतला अष्टमी व्रत

Somvati Amavasya 2021 | सोमवती अमावस्या कधी, जाणून घ्या महत्त्व आणि शुभ मुहूर्त…

जेव्हा पांडव आणि महादेव यांच्यात युद्ध झालं, जाणून घ्या नेमकं काय झालं होतं?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.