Chaitra Navratri 2022 | कधीपासून सुरु होतेय ‘चैत्र नवरात्री’, जाणून घ्या कुठल्या दिवशी दुर्गा देवीच्या कुठल्या स्वरुपाची पूजा होणार ? काय आहे आख्यायिका

हिंदू (Hindu) धर्मात स्त्री शक्तीच्या जागराला विषेश महत्त्व देण्यात आले आहे. म्हणूनच शक्तीच्या उपासनेचा सण नवरात्र वर्षातून चार वेळा साजरा करण्यात येतो.

Chaitra Navratri 2022 | कधीपासून सुरु होतेय ‘चैत्र नवरात्री’, जाणून घ्या कुठल्या दिवशी दुर्गा देवीच्या कुठल्या स्वरुपाची पूजा होणार ? काय आहे आख्यायिका
Navratri
Follow us
| Updated on: Mar 30, 2022 | 1:50 PM

मुंबई : हिंदू (Hindu) धर्मात स्त्री शक्तीच्या जागराला विषेश महत्त्व देण्यात आले आहे. म्हणूनच शक्तीच्या उपासनेचा सण नवरात्र वर्षातून चार वेळा साजरा करण्यात येतो. पहिली वासंतिक नवरात्र पहिल्या चैत्र महिन्यात येते , दुसरी नवरात्र आषाढ महिन्यात, तिसरी अश्विन महिन्यात म्हणजे शारदीय नवरात्री आणि चौथी नवरात्र अकराव्या महिन्यात म्हणजेच माघ महिन्यात येते . यापैकी माघ महिन्यात येणाऱ्या नवरात्रीला “माघ गुप्त नवरात्र” (Gupt Navratri 2022 ) आणि आषाढ महिन्यात येणाऱ्या नवरात्रीला “ आषाढ गुप्त नवरात्र” म्हणतात. नवरात्रीच्या नऊ दिवशी देवीच्या (Chaitra Navratri 2022) नऊ रुपांची पूजा केली जाते. या दरम्यान भक्त विधीवत देवी दुर्गाची पूजा करतात. तर काही लोक या नऊ दिवसांदरम्यान उपवास ठेवतात. हिंदू पंचांगांनुसार, चैत्र महिन्याची सुरुवात झाली आहे. या महिन्यात चैत्र नवरात्रीचा (Chaitra Navratri) उत्सव साजरा केला जातो. चला जाणून घेऊ कुठल्या दिवशी सुरु होईल नवरात्री –

या दिवशी नवरात्रीला होणार सुरुवात –

यावेळी चैत्र नवरात्रीची सुरुवात 2 एप्रिल 2022 . तर 10 एप्रिलला नवरात्री समाप्त होईल. 2 एप्रिल 2022ला नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलश स्थापना केली जाते. नवरात्रीदरम्यान नऊ दिवशी देवी दुर्गेच्या नऊ स्वरुपांची विधीवत पूजा केली जाते. 2 एप्रिल 2022च्या दिवशी कलशाची स्थापना होईल. नवरात्रीला कलश स्थापना करण्याला विशेष महत्त्व असते. अशी मान्यता आहे की कलश स्थापन केल्याने घरात सुख-समृद्धी असते.

घट स्थापनेचा शुभ मुहूर्त

घट स्थापनेचा शुभ मुहूर्त 2 एप्रिल 2022 ला शनिवारी सकाली 5 वाजून 28 मिनिटांपासून ते 19 वाजून 14 मिनिटांपर्यंत असेल. नवरात्रीच्या दिवशी कलश स्थापित केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. याद्वारे देवी दुर्गाची कृपा तुमच्यावर रहाते आणि तुम्हाला शुभ फळ मिळतात.

नवरात्रीचे नऊ दिवस

2 एप्रिल – देवी शैलपुत्री नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरात कलश स्थापना केली जाते. नवरात्रीचा पहिला दिवस देवी शैलपुत्रीला समर्पित असतो. या दिवशी विधीवत उपासना केल्यास देवी शैलपुत्रीचा आशीर्वाद मिळतो.

3 एप्रिल  – देवी ब्रह्मचारिणी नवरात्रीचा दुसरा दिवस देवी ब्रह्मचारिणीला समर्पित असतो. या दिवशी उपासना केल्यास व्यक्तीचा संयम वाढतो आणि राग नियंत्रित होतो.

4 एप्रिल – देवी चंद्रघंटा नवरात्रीच्या तिसर्‍या दिवशी देवी चंद्रघंटाची पूजा केली जाते. या दिवशी पूजा केल्यास व्यक्तीच्या बोलण्यात गोडवा वाढतो.

5 एप्रिल – देवी कुष्मांडा नवरात्रीचा चौथा दिवस देवी कुष्मांडा यांनी समर्पित असतो. या दिवशी देवी कुष्मांडाची पूजा केल्याने रोग दूर होतात.

6 एप्रिल – देवी स्कंदमाता नवरात्रीचा पांचवा दिवस देवी स्कंदमातेला समर्पित असतो. या दिवशी देवी दुर्गाची पूजा केल्याने यश आणि धन प्राप्ती होते.

7 एप्रिल – देवी कात्यायनी नवरात्रीचा सहावा दिवस देवी कात्यायनीला समर्पित असतो. या दिवशी देवी दुर्गेचं सहावं स्वरुप कात्यायनीचं पूजन केल्याने शत्रू अशक्त होतो.

8 एप्रिल – देली काळरात्री नवरात्रीचा सातवा दिवस देवी काळरात्रीला समर्पित असतो. या दिवशी पूजा-अर्चना केल्याने पापातून मुक्ती मिळते. अशी मान्यता आहे.

9 एप्रिल – देवी महागौरी नवरात्रीचा आठवा दिवस देवी महागौरीची पूजा केली जाते. या दिवशी पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी येते. अष्टमीचा दिवस अत्यंत शुभ असतो.

10 एप्रिल – देवी सिद्धीदात्री नवरात्रीच्या नवव्या दिवशी देवी सिद्धीदात्रीची पूजा-अर्चना केली जाते. या दिवशी पूजा केल्याने व्यक्तीला व्यक्तीला नवीन निधी प्राप्त होतो.

(येथे दिलेली माहिती ही धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

संबंधीत बातम्या :

एप्रिल महिन्यात ‘या’ राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यातील सर्व इच्छा पूर्ण होणार, देवी लक्ष्मी प्रसन्न होणार

Lord Shiva Worship Rules | भगवान शंकराची पूजा करताना या सात महत्त्वाच्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा

राम कृष्ण हरी ! पापमोचनी एकादशी निमित्त संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात आकर्षक सजावट

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.