नवरात्रीच्या सातव्या दिवशी होणार देवीच्या कालरात्री रुपाचा जागर जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व
आज चैत्र शुक्ल पक्षातील सप्तमी (Saptami)तिथी आणि शुक्रवार आहे. आज सप्तमी तिथी रात्री ११.०५ पर्यंत राहील. त्यानंतर अष्टमी तिथी सुरू होईल.
मुंबई : आज चैत्र शुक्ल पक्षातील सप्तमी (Saptami)तिथी आणि शुक्रवार आहे. आज सप्तमी तिथी रात्री ११.०५ पर्यंत राहील. त्यानंतर अष्टमी तिथी सुरू होईल. आज नवरात्रीचा सातवा दिवस. नवरात्रीच्या (Navratri) काळात येणारी सप्तमी ही महासप्तमी म्हणून ओळखली जाते. आज देवी दुर्गेचे (Durga)सातवे रूप देवी कालरात्रीची पूजा केली जाणार आहे. जेव्हा माता पार्वतीने शुंभ-निशुंभाचा वध करण्यासाठी आपल्या सुवर्ण वर्णाचा त्याग केला तेव्हा तिला कालरात्री म्हणून ओळखले जाऊ लागले. देवी कालरात्रीला चार हात आहेत, त्यापैकी वरचा उजवा हात वरद मुद्रेत आणि खालचा हात अभय मुद्रामध्ये आहे. वरच्या डाव्या हातात लोखंडी काटा आणि खालच्या हातात खडग आहे. सातव्या दिवशी माँ कालरात्रीची पूजा करण्याचा काही नियम आहेत. मातेचे हे रूप उग्र मानले जाते. तिचा रंग काळा असून तिला तीन डोळे आहेत. देवी कालरात्री आपल्या भक्तांना नेहमी आशीर्वाद देते, म्हणून तिला शुभंकारी असेही म्हणतात.
पुजा करण्याची पद्धत
चैत्र नवरात्रीच्या सातव्या दिवशी पांढरे किंवा लाल वस्त्र परिधान करून माँ कालरात्रीची पूजा करावी. तुपाचा दिवा लावून कालरात्रीला लाल फुले अर्पण करा. यासोबतच आईला गुळाचा नैवेद्य दाखवावा. यानंतर माँ कालरात्रीच्या मंत्रांचा जप करावा आणि शक्य असल्यास दुर्गा सप्तशतीचा पाठही करावा. आईचे हे रूप बघायला भयंकर वाटत असले तरी ते खूप शुभ आहे. म्हणून देवीचे एक नाव शुंभकरी देखील आहे. ग्रहांमध्ये, मातृदेवतेचे प्रभुत्व शनि ग्रहावर असल्याचे सांगितले जाते. त्यांचे स्मरण केल्याने भूत, पिशाच, भय आणि इतर कोणत्याही प्रकारचे संकट लगेच दूर पळतात.
सकाळी कालरात्रीची पूजा करणे शुभ मानले जाते. मातेची पूजा करण्यासाठी लाल रंगाचे कपडे परिधान करावेत. मकर आणि कुंभ राशीच्या लोकांनी कालरात्रीची पूजा अवश्य करावी. अडचणीत असल्यास सात किंवा नऊ लिंबांची माळ देवीला अर्पण करावी. सप्तमीच्या रात्री तिळ किंवा मोहरीच्या तेलाची अखंड ज्योत पेटवावी. सिद्धकुंजिका स्तोत्र, अर्गल स्तोत्र, काली चाळीसा, काली पुराण यांचे पठण करावे. या रात्री शक्यतो संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठण करावे.
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधीत बातम्या
Vastu Tips : ही चमत्कारी वनस्पती घरामध्ये लावा आणि सुख-समृद्धी मिळवा!
Zodiac | आजचा रविवार ‘या’ 4 राशींसाठी अत्यंत शुभ, धनलाभ होण्याचा योग!