Chaitra Navratri 2023 : चैत्र नवरात्रीच्या आधी घरी आणा या पाच वस्तू, कधीच भासणार नाही पैशांची समस्या

ज्योतिष शास्त्राचे तज्ज्ञ सांगतात की चैत्र नवरात्रीच्या आधी घराची नीट साफसफाई करा आणि घरात शुभता वाढवणाऱ्या काही खास गोष्टी आणा.

Chaitra Navratri 2023 : चैत्र नवरात्रीच्या आधी घरी आणा या पाच वस्तू, कधीच भासणार नाही पैशांची समस्या
चैत्र नवरात्रीImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Mar 16, 2023 | 4:13 PM

मुंबई : चैत्र महिन्यातील प्रतिपदेपासून नवरात्रीची (Chaitra Navratri) सुरुवात होते. हिंदू नववर्षही या दिवसापासून सुरू होते. चैत्र नवरात्रीपासून पुढील नऊ दिवस माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. यापैकी माता शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, माता कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री यांची पूजा करण्याचा विधी आहे. यंदा 22 मार्चपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होत आहे. ज्योतिष शास्त्राचे तज्ज्ञ सांगतात की चैत्र नवरात्रीच्या आधी घराची नीट साफसफाई करा आणि घरात शुभता वाढवणाऱ्या काही खास गोष्टी आणा.

चैत्र नवरात्रीच्या आधी घरी आणा या वस्तू

  1. सोन्याचे किंवा चांदीचे नाणे- नवरात्रीमध्ये सोन्याचे किंवा चांदीचे नाणे घरात आणणे देखील खूप शुभ मानले जाते. नाण्यावर लक्ष्मी किंवा गणपतीचे चित्र असेल तर ते अधिक शुभ असते. हे नाणे घरातील देवघरात स्थापित करा.
  2. पितळी हत्ती- दिवाणखान्यात लहान पितळेचा हत्ती ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. पितळी हत्ती केवळ नकारात्मक ऊर्जाच दूर ठेवत नाही तर यशाचा मार्गही उघडतो. चैत्र नवरात्रीत तुम्ही घरीही आणू शकता. पण लक्षात ठेवा की या हत्तीची सोंड वरची असावी.
  3. धातूपासून बनवलेले श्रीयंत्र- चैत्र नवरात्रीच्या काळात तुम्ही खास धातूपासून बनवलेले श्रीयंत्रही आणू शकता. सोन्यापासून बनवलेले श्रीयंत्र नेहमीच प्रभावी असते, असे म्हटले जाते. तर चांदीच्या श्रीयंत्राचा शुभ प्रभाव अकरा वर्षे टिकतो. दुसरीकडे तांब्यापासून बनवलेल्या श्रीयंत्राची शक्ती दोन वर्षांनी संपते. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार कोणतेही श्रीयंत्र घरी आणू शकता.
  4. सोळा शृंगार- नवरात्रीपूर्वी सोळा शृंगार वस्तू घरात आणणे खूप शुभ मानले जाते. घरातील मंदिरात या साहित्याची प्रतिष्ठापना केल्याने माँ दुर्गेचा आशीर्वाद सदैव राहतो आणि पतीलाही दीर्घायुष्याचे वरदान मिळते.
  5. कमळावर बसलेले देवीचे चित्र- नवरात्रीमध्ये घरात ऐश्वर्य आणि समृद्धी येण्यासाठी देवी लक्ष्मीचे असे चित्र लावा, ज्यामध्ये ती कमळावर बसलेली आहे. यासोबतच त्यांच्या हातून पैशांचा पाऊस पडत आहे.

घटस्थापना चा शुभ मुहूर्त देखील जाणून घ्या

बुधवार, 22 मार्चपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होत आहे. चैत्र नवरात्रीत प्रतिपदेला घटस्थापना होते. चैत्र प्रतिपदा तिथी 21 मार्च रोजी रात्री 10.52 ते दुसऱ्या दिवशी म्हणजेच 22 मार्च रात्री 08.20 पर्यंत असेल. घटस्थापना शुभ मुहूर्ताचा प्रारंभ 22 मार्च रोजी सकाळी 06.23 ते 07.32 पर्यंत असेल. म्हणजेच घटस्थापनेसाठी तुम्हाला एकूण 01 तास 09 मिनिटे वेळ मिळेल.

हे सुद्धा वाचा

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.