Chaitra Navratri 2023 : चैत्र नवरात्रीतील अष्टमीला करा हे उपाय, नोकरी आणि व्यवसायात होईल प्रगती
चैत्र नवरात्रीत देवी दुर्गेची मनोभावे पूजा केल्यानंतर आशीर्वाद मिळतो. या काळात अष्टमीला काही प्रभावी तोडगे केल्यास संकटातून बाहेर निघण्याचा मार्ग सापडतो. चला जाणून घेऊयात ज्योतिषीय उपाय
मुंबई : चैत्र नवरात्री सुरु असून या नऊ दिवसातील प्रत्येक दिवस उपासनेसाठी महत्त्वाचा आहे. या नऊ दिवसात देवीच्या विविध रुपांची उपासना केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार देवी दुर्गेची मनोभावे पूजा केल्यानं अपेक्षित यश मिळतं. चैत्र नवरात्रीत अष्टमीचं वेगळं असं महत्त्व आहे. या दिवशी पूजाविधी केल्यास लवकर फळ मिळतं अशी मान्यता आहे. आर्थिक कोंडी फुटते आणि कौटुंबिक वातावरणही चांगलं राहतं. चैत्र नवरात्री 30 मार्च रोजी म्हणजेच रामनवमी संपन्न होईल. तर महाअष्टमी 29 मार्च रोजी असणार आहे. तुम्हाला रोजगार आणि व्यवसायात प्रगती करायची असेल, तर महाअष्टमीला विड्याच्या पानांचा उपाय करा.
अष्टमीला करा हे उपाय
- देवी दुर्गेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अष्टमीला विड्याचा पानांचा खास उपाय करू शकता. पानावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवून देवी दुर्गेला अर्पण करा. यामुळे धनप्राप्ती होण्यास मदत होते.
- चैत्र नवरात्रीत देवी दुर्गेला विड्याचं पान द्या. यामुळे जीवनात सुख, शांती आणि समृद्धीचं आगमन होतं.
- तुम्ही जर कर्जाच्या ओझ्याखाली असाल तर विड्याच्या पानांचा उपाय करू शकता. यासाठी विड्याच्या पानावर एक वेलची आणि लवंग ठेवून विडा बनवा. आता हा विडा देवीच्या चरणाशी अर्पण करा. या उपायामुळे तुमची कर्जातून लवकरच सुटका होईल.
- करिअरमध्ये नावलौकिक मिळवायचा असेल तर महअष्टमीच्या दिवशी पानावर मोहरीचं तेल काही थेंब टाकून देवी दुर्गेला अर्पण करा. यामुळे करिअरमध्ये निश्चितच यश मिळेल. त्याचबरोबर चांगली नोकरीची ऑफर मिळू शकते.
- व्यवसायात यश मिळवण्यासाठई अष्टमीला पिंपळ, आंबा आणि विड्याची पानं एका धाग्याने बांधा. काम करत असलेल्या ठिकाणी पूर्व दिशेला बांधा. यामुळे व्यवसायात शीघ्र यश मिळण्यास मदत होते.
- कौटुंबिक वातावर खराब असेल किंवा जोडीदारासोबत वाद होत असेल तर अष्टमीला विड्याचा पानाचा उपाय करा. पानावर शेंदुराने जय श्री राम लिहून राम मंदिरात जाऊन मारुतीच्या चरणाशी अर्पण करा.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
Non Stop LIVE Update