Chaitra Navratri : उद्यापासून चैत्र नवरात्रीला सुरूवात, जाणून घ्या घटस्थापनेचा मुहूर्त आणि विधी

नवरात्रीच्या काळात 23 मार्च, 27 मार्च आणि 30 मार्चला 3 सर्वार्थ सिद्धी योग होणार आहेत. तर 27 मार्च आणि 30 मार्च रोजी अमृत सिद्धी योग होणार आहे.

Chaitra Navratri : उद्यापासून चैत्र नवरात्रीला सुरूवात, जाणून घ्या घटस्थापनेचा मुहूर्त आणि विधी
घटस्थापनाImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Mar 21, 2023 | 9:03 AM

मुंबई : 22 मार्चपासून चैत्र नवरात्रीला (Chaitra Navratri 2023) सुरुवात होत आहे. यासोबतच रामाच्या नवरात्रीला पण सुरूवात होत आहे. यंदा चैत्र नवरात्रीत मातेचे वाहन नौका असणार आहे. नवरात्रोत्सव वर्षातून 4 वेळा साजरा केला जातो. अश्विन आणि चैत्र महिन्यातील नवरात्र सर्वात लोकप्रिय आहे. चैत्र नवरात्रीपासूनच नवीन पर्व सुरू झाले अशी धार्मिक मान्यता आहे.  यावेळी चैत्र नवरात्रीत संपूर्ण नऊ दिवस नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे. नवरात्रीच्या काळात 23 मार्च, 27 मार्च आणि 30 मार्चला 3 सर्वार्थ सिद्धी योग होणार आहेत. तर 27 मार्च आणि 30 मार्च रोजी अमृत सिद्धी योग होणार आहे. 24, 26 आणि 29 मार्च रोजी रवि योग होणार आहे. गुरु पुष्य योग नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे रामनवमीच्या दिवशीही असेल. नवरात्रीची सुरुवात घटस्थापनेने होते. चला जाणून घेऊया नवरात्रीच्या घटस्थापनेचे नियम आणि योग्य मुहूर्त कोणते आहेत.

घटस्थापना मुहूर्त

यावेळी नवरात्रीची प्रतिपदा 22 मार्च रोजी येत आहे. या दिवशी कलशाची स्थापनाही केली जाईल. घटस्थापनेसाठी सर्वोत्तम वेळ सकाळी 06.23 ते 07.32 पर्यंत असेल.

घटस्थापनेचे काही महत्त्वाचे नियम

  1. चुकीच्या दिशेने घट ठेवू नका- चुकीच्या दिशेने घटस्थापना करणे टाळा. ईशान्य ही देवतांची दिशा आहे. कलशाची स्थापना याच दिशेने करावी.
  2. कलश उघडे ठेवू नका- शारदीय नवरात्रीला कलशाची स्थापना करणार असाल तर लक्षात ठेवा की कलशाचे तोंड उघडे राहू नये. त्यावर आंब्याचे पाच पान आणि नारळ ठेवा.
  3. कलश स्थापन करण्यापूर्वी करा हे काम- कलश स्थापित करण्यापूर्वी देवीसमोर अखंड ज्योत लावा. ही दिशा आग्नेय कोनात (पूर्व-दक्षिण) ठेवा. कलश बसवताना साधकाने आपले तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेलाच ठेवावे.
  4. स्वच्छतेची काळजी घ्या- घरातील ज्या ठिकाणी कलश किंवा देवीची स्थापना करणार आहात त्या ठिकाणी स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. घटस्थापना चंदनाच्या पाटावर केल्यास जास्त शुभ असते.
  5. या ठिकाणी घटस्थापना करू नका- घटस्थापना करण्याचे ठिकाण बाथरूम किंवा स्वयंपाकाच्या ओट्याजवळ नसावे.

घटस्थापनेचा विधी

घटस्थापनेच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठावे आणि स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करावेत. त्यानंतर स्वच्छ ठिकाणी लाल रंगाचे कापड पसरून देवीची मूर्ती स्थापित करा. या कपड्यावर थोडे तांदूळ ठेवा. मातीच्या भांड्यात बार्ली पेरा. या भांड्यावर पाण्याने भरलेला कलश बसवावा. कलशावर स्वस्तिक बनवून त्यावर कलव (लाल धागा) बांधावा. कलशात आंब्याची पाने  संपूर्ण सुपारी, नाणे आणि अक्षत टाका. एक नारळ घेऊन त्याला दोऱ्याने सुतवावे. हे नारळ कलशावर ठेवून दुर्गा देवीचे आवाहन करा. यानंतर दिवा लावून कलशाची पूजा करावी. नवरात्रीमध्ये देवीच्या पूजेसाठी सोने, चांदी, तांबे, पितळ किंवा मातीच्या कलशाची स्थापना केली जाते.

हे सुद्धा वाचा

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.