Chaitra Navratri 2023 : नवरात्रीच्या पाचव्या दिवशी करा स्कंदमातेची पुजा, अत्यंत प्रभावी आहे देवीचा हा मंत्र
कार्तिकेयाची (स्कंद) माता असल्याने तिला स्कंदमाता म्हणतात. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवीच्या या रूपाची पुजा केली जाते. पुजेची पद्धत काय आहे ते जाणून घेऊया.
मुंबई : नवरात्रीच्या (Chaitra Navratri 2023) पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा (Skandamata) केली जाते. नवदुर्गेचे पाचवे रूप स्कंदमातेचे आहे. कार्तिकेयाची (स्कंद) माता असल्याने तिला स्कंदमाता म्हणतात. चतुर्रभूजा असलेली ही देवी कमळाच्या फुलावर विराजमान आहे, म्हणूनच तिला पद्मासन देवी असेही म्हणतात. कार्तिकेयही तिच्या मांडीवर बसलेला असतो, म्हणून देवीच्या पूजेसोबतच कार्तिकेयची पूजा केली जाते. स्कंदमातेच्या उपासनेच्या पद्धतीबद्दल अधीक माहिती जाणून घेऊया.
स्कंदमातेची पूजेने कोय लाभ होतो?
स्कंदमातेची पूजा केल्याने संतती प्राप्त होते. याशिवाय जर मुलांशी संबंधीत काही समस्या असेल तर ती देखील सुटू शकते. स्कंदमातेच्या पूजेमध्ये पिवळी फुले, पिवळ्या वस्तू अर्पण करा. पिवळे कपडे परिधान केल्यास पूजेचे फळ आणखी शुभ मिळते. पुजेनंतर देवी मातेसमोर बसून प्रार्थना करा.
कुंडलीत बृहस्पति बलवान होतो
स्कंदमातेची पूजा केल्याने देवगुरु बृहस्पती कुंडलीत बलवान बनवता होतो. यासाठी आधी पिवळे कपडे परिधान करून मग देवीसमोर प्रार्थना करावी. यानंतर “ओम ग्रं हरी ग्रं सह गुरुवे नमः” चा जप करावा. बृहस्पति ग्रहाला बळ देण्यासाठी मातेची प्रार्थना करा. तुमचा बृहस्पति बलवान होईल.
स्कंदमातेचा आवडता प्रसाद
नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमातेला केळी अर्पण करा. यानंतर प्रसाद स्वरूपात ते वाटा. मुलांचे आणि आरोग्याचे अडथळे दूर होतील. यानंतर स्कंदमातेचा विशेष मंत्र- “यशोदागर्भ समभाव नंदगोपगृहे जातो. ततस्तौ नाशायिष्यामी विंध्याचलनिवासिनी जप करा.
स्कंदमातेची उपासना पद्धत
पिवळ्या कापडात एक नारळ देवीसमोर ठेवावा. स्वतः पिवळे वस्त्र परिधान करून 108 वेळा “नन्दगोपगृहे जाता यशोदागर्भ सम्भवा. ततस्तौ नाशयिष्यामि विन्ध्याचलनिवासिनी” या मंत्राचा जप करा. यानंतर एका कापडात नारळ बांधून तुमच्या बेडरूमच्या छतावर लटकवा. स्कंदमातेची पूजा केल्याने इच्छीतांना संतती प्राप्त होते. स्कंदमातेच्या पूजेत पिवळे फुले अर्पण करून पिवळ्या वस्तू अर्पण करा.
कालिदासांनी रचलेल्या रघुवंशम महाकाव्य आणि मेघदूत रचना स्कंदमातेच्या कृपेनेच शक्य झाल्या, असे मानले जाते. कोणतीही उपासना तेव्हाच पूर्ण मानली जाते जेव्हा तुम्ही तुमच्या दैवताला प्रिय वस्तू अर्पण करता.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)