Chaitra Navratri 2024 : या वर्षी किती तारखेपासून सुरू होणार चैत्र नवरात्री? असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त
चैत्र नवरात्रोत्सव (Chaitra Navratri 2024) मार्च किंवा एप्रिल महिन्यात येतो. हा शुभ सण हिंदू नऊ दिवस मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा करतात. या उत्सवादरम्यान देवी दुर्गा आणि तिच्या नऊ दिव्य रूपांची पूजा केली जाते.
मुंबई : नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. हिंदू दिनदर्शीकेनुसार, नवरात्र वर्षातून चार वेळा येते, त्यापैकी एक शारदीय नवरात्री, एक चैत्र आणि दोन गुप्त नवरात्री आहेत. चैत्र महिन्यात येणाऱ्या चैत्र नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. अशा परिस्थितीत 2024 मध्ये चैत्र नवरात्री कधी सुरू होत आहे हे जाणून घेऊया. चैत्र नवरात्र ही चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षात येते आणि या सणाला वसंत नवरात्री असेही म्हणतात. चैत्र नवरात्रोत्सव (Chaitra Navratri 2024) मार्च किंवा एप्रिल महिन्यात येतो. हा शुभ सण हिंदू नऊ दिवस मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा करतात. या उत्सवादरम्यान देवी दुर्गा आणि तिच्या नऊ दिव्य रूपांची पूजा केली जाते.नवरात्रीचा प्रत्येक दिवस दुर्गेच्या नऊ रूपांना समर्पित असतो आणि त्यानुसार पूजा केली जाते. या वेळी चैत्र नवरात्र कधी आहे आणि कलशाची स्थापना कोणत्या वेळी केली जाईल ते जाणून घेऊया.
चैत्र नवरात्री कधी सुरू होणार?
- चैत्र नवरात्रीचा उत्सव 9 एप्रिल 2024 पासून सुरू होईल आणि 17 एप्रिल 2024 रोजी संपेल.
- चैत्र घटस्थापनेचा मुहूर्त मंगळवार, 9 एप्रिल 2024 रोजी सकाळी 06:26 ते 10:35 पर्यंत असेल.
नवरात्री कलश स्थापना विधी
नवरात्रोत्सवात दररोज सकाळी लवकर उठले पाहिजे. त्यानंतर आंघोळ करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावी. पूजेला सुरुवात करण्यापूर्वी पूजास्थानाची स्वच्छता करावी. नंतर तांब्याचा कलश घेऊन त्यात पाणी भरावे. कलशावर रोळी घालून स्वस्तिक बनवावे, त्यानंतर कलशावर आंब्याची पाने व नारळ ठेवावा.
नऊ दिवसांचा उपवास आणि उपासना कोणत्याही समस्येशिवाय पूर्ण करण्यासाठी, तुम्ही श्री गणेशाची प्रार्थना केली पाहिजे. नऊ दिवसांपैकी प्रत्येक दिवशी देवीला फळे, फुले, मिठाई आणि प्रसाद अर्पण करावा. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी दुर्गा देवीची आरती करावी.
दुर्गेच्या नऊ रूपांची नावे – शैलपुत्री, ब्रह्मचारिणी माता, चंद्रघंटा माता, कुष्मांडा, स्कंद माता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)