Chanakya Neeti : आयुष्यात सुखी राहायचं असेल तर या 3 गोष्टी कोणालाच सांगू नका, आर्य चाणक्य काय म्हणतात?
आर्य चाणक्य हे एक थोर राजनीती तज्ज्ञ, कूटनीती तज्ज्ञ आणि अर्थशास्त्राज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहीला. या ग्रंथामध्ये त्यांनी समाजाला उपयोगी पडतील असे अनेक विचार मांडले.

आर्य चाणक्य हे एक थोर राजनीती तज्ज्ञ, कूटनीती तज्ज्ञ आणि अर्थशास्त्राज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहीला. या ग्रंथामध्ये त्यांनी समाजाला उपयोगी पडतील असे अनेक विचार मांडले. आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये जे विचार मांडले ते आजही अनेकांना आपलं जीवन जगताना मार्गदर्शक ठरतात.
आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये आयुष्य कसं जगावं, काय करावं? काय करू नये? आदर्श राजा कसा असावा, आदर्श पती कसा असावा, मुलांची कर्तव्य कोणती? पत्नीने काय करावं? काय करू नये? आयुष्यात सुखी व्हायचं असेल तर कोणत्या गोष्टी कराव्यात? कोणत्या गोष्टी करू नये अशा विविध विषयांवर लिखान केलं आहे. जर तुम्हाला तुमचं आयुष्य सुखी आणि आनंदात जगायचं असेल तर अशा काही गोष्टी आहे, ज्या तुम्ही इतरांपासून लपवून ठेवण्याची आवश्यकता आहे, असं आर्य चाणक्य म्हणतात. आज आपण अशाच तीन गोष्टींबाबत माहिती घेणार आहोत, ज्या आर्य चाणक्य यांनी सांगितल्या आहेत. या गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्ही इतरांना सांगितल्या तर त्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं.
आर्य चाणक्य म्हणतात जर तुम्हाला धनाशी संबंधित गोष्टींमध्ये काही नुकसान झालं, तर ही गोष्टी तुम्ही इतर कोणालाही सांगू नका. यामुळे तुमचं अधिक नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमच्या संपत्तीबाबत कोणाशीही चर्चा करू नका, असा सल्ला आर्य चाणक्य देतात. तुम्ही आर्थिक संकटात आहात, हे जेव्हा लोकांना कळेल तेव्हा ते तुमच्यापासून दूर जातील असंही आर्य चाणक्य यांनी म्हटलं आहे.
आर्य चाणक्य पुढे सांगतात की व्यक्तीने आपल्या आयुष्यातील दु:ख इतरांना कधीच सांगितलं नाही पाहिजे ज्यामुळे तुम्ही कमजोर पडू शकता. लोक तुमचा फायदा घेतील. तुमच्यावर विनोद देखील करतील.
जर तुमचा तुमच्या आयुष्यात कधी अपमान झाला असेल तर त्याबाबत देखील कोणाशीही चर्चा करू नका, कोणालाही सांगू नका असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)