Chanakya Niti : आचार्य चाणक्य म्हणतात फक्त या 5 गोष्टींचं पालन करा, आयुष्यात कोणतंच संकट येणार नाही
आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथांमध्ये असे अनेक विचार सांगीतले आहेत, जे आज देखील अनेकांना आपलं आयुष्य जगताना मार्गदर्शक ठरत आहेत.
महाभारत काळातील विदुर नीती नंतर जर कोणाची नीती जगप्रसिद्ध असेल तर ती म्हणजे आर्य चाणक्य यांची. आर्य चाणक्य यांना त्यांच्या बुद्धिमत्तेसाठी ओळखलं जातं. आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथांमध्ये असे अनेक विचार सांगीतले आहेत, जे आज देखील अनेकांना आपलं आयुष्य जगताना मार्गदर्शक ठरत आहेत. आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीतिमध्ये अशा पाच गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आत्मसात केल्या तर व्यक्ती कोणत्याही अडचणीवर यशस्वीपणे मात करू शकतो. जाणून घेऊयात त्याबद्दल
वेळेचा सदुपयोग : तुमच्या आयुष्यात जर सर्वात काही मौल्यवान असेल तर तो तुमचा वेळ आहे. एकदा आयुष्यातून वेळ निघून गेली की ती परत कधीच पुन्हा येत नाही. त्यामुळेच चाणक्य म्हणतात वेळेचा सदुपयोग करा. कोणताही क्षण व्यर्थ जाऊ देऊ नका, तुम्ही जर तुमचं धन हरवलं असेल तर ते तुम्हाला परत मिळेल. मात्र वेळ कधीच पुन्हा मिळणार नाही.
संयम आणि शिस्त: चाणक्य म्हणतात आयुष्य जगत असताना या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे तुमच्याकडे संयम असला पाहिजे आणि दुसरी गोष्ट गरजेची असते ती म्हणजे शिस्त. या दोन गोष्टी यशस्वी जीवनाचा मूलमंत्र आहे.
ध्येयावर लक्ष केंद्रीत करा : आचार्य चाणक्य असं म्हणतात की तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात एखादी गोष्ट मिळवायची असेल तर तुमचं सर्व लक्ष त्या गोष्टीवर केंद्रीत असलं पाहिजे. तर आणि तरच तुम्हाला फळाची प्राप्ती होऊ शकते.
चांगली संगत : चाणक्य म्हणतात वाईट संगत हा तुमच्या प्रगतीमधील सर्वात मोठा अडथळा आहे, त्यामुळे संगत नेहमी चांगली ठेवा , तुम्ही कोणासोबत आहात याचा फार मोठा परिणाम हा तुमच्या आयुष्यावर होतो.
ज्ञान : आर्य चाणक्य म्हणतात ज्ञानाला पर्याय नाही, त्यामुळे तुम्हाला जिथून ज्ञान मिळेल तिथून ते तुम्ही प्राप्त केलं पाहिजे. तुमच्याकडे जर ज्ञान असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यात येणाऱ्या कोणत्याही संकटावर सहज मात करू शकता.