Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : आर्य चाणक्य म्हणतात फक्त ही एक सवय बदला, यश तुमचंच

आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये व्यक्तीला ज्या गोष्टींमुळे अपयश येऊ शकतं अशा कारणांवर चर्चा केली आहे, तुम्ही जर या गोष्टी टाळल्या तर यश हे तुमचंच असणार आहे, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

Chanakya Niti : आर्य चाणक्य म्हणतात फक्त ही एक सवय बदला, यश तुमचंच
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 06, 2025 | 7:59 PM

आर्य चाणक्य हे एक महान राजनीतीतज्ज्ञ, कुटनीतीतज्ज्ञ, अर्थशास्त्र होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये त्यांनी अशा अनेक गोष्टींवर चर्चा केली, ज्या गोष्टी आज देखील काही लोकांना आपलं आयुष्य जगताना मार्गदर्शक ठरतात. आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती या ग्रथांमध्ये व्यक्तीची आदर्श जीवनपद्धत कशी असावी याबद्दल सखोल माहिती दिली आहे. ज्यामध्ये जीवन जगत असताना कोणत्या गोष्टी कराव्यात? कोणत्या गोष्टी करू नयेत? आदर्श पती कसा असावा, आदर्श पतीची लक्षणं काय? आदर्श पत्नी कशी असावी, आदर्श पत्नीची लक्षणं कोणती? राजाचा त्याच्या प्रजेसोबतचा व्यवहार कसा असावा? आपला मित्र कोण आणि शत्रू कोण हे कसं ओळखावं असे एकना अनेक विचार आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये मांडले आहेत.

दरम्यान आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीतीमध्ये अशा काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या व्यक्तीच्या दैनंदीन जीवनाशी निगडीत आहेत. आर्य चाणक्य यांनी व्यक्तीच्या अशा काही सवयी सांगितल्या आहेत, ज्यामुळे तुम्ही जे काम करणार आहात, त्या कामामध्ये बाधा निर्माण होण्याची शक्यता असते. आर्य चाणक्य म्हणतात या सवयी तुम्ही जर टाळल्या तर यश मिळवण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. याच सवयीबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.

आर्य चाणक्य म्हणतात की तुम्ही जर एखादं महत्त्वाचं काम हाती घेतलं असेल तर ते पूर्णत्वास जाईपर्यंत कोणालाही त्याबद्दल सांगू नका, तुमच्या किती जवळच्या माणूस असला तरी तुमच्या सर्व योजना या गुप्त ठेवा, तुम्हाला त्या कामामध्ये यश मिळेल. चाणक्य पुढे म्हणतात की तुम्ही जर एखादी योजना, काम हाती घेतलं तर स्वस्त बसू नका, आळस करू नका, आळस हा ते काम आणि तुमच्यामधील सर्वात मोठा शत्रू आहे. आळस न करता दिवस रात्र मेहनत करा. तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामात यश मिळेल, असं आर्य चाणक्य यांनी म्हटलं आहे.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.