Chanakya Niti : चाणक्य म्हणतात आयुष्यातील या तीन गोष्टी कधीच कोणाला सांगू नका, नाहीतर येईल पश्चतापाची वेळ
आर्य चाणक्य हे थोर अर्थतज्ज्ञ, कुटनीती तज्ज्ञ आणि विद्वान होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रथांमध्ये त्यांनी अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या व्यक्तीला आजच्या काळात देखील आपलं आयुष्य जगताना मार्गदर्शक ठरतात.

आर्य चाणक्य हे थोर अर्थतज्ज्ञ, कुटनीती तज्ज्ञ आणि विद्वान होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रथांमध्ये त्यांनी अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या व्यक्तीला आजच्या काळात देखील आपलं आयुष्य जगताना मार्गदर्शक ठरतात. आर्य चाणक्य यांच्या चणाक्य नीती ग्रथांमध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा करण्यात आली आहे, ज्यामध्ये आदर्श पती कसा असावा? आदर्श पत्नी कशी असावी? चांगला राजा कोणाला म्हणावे? त्याच्यामध्ये कोणते गुण असावेत. आयुष्य जगत असताना कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणत्या गोष्टी करू नये. एखादी गोष्ट करण्यासाठीची योग्य वेळ कोणती. मुलांवर चांगले संस्कार कसे करावेत? अशा अनेक गोष्टी आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत.
आर्य चाणक्य म्हणतात की जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात आनंदी राहिचं असेल तर तुमच्या आयुष्याशी संबंधित अशा काही गोष्टी असतात ज्या कोणालाच सांगता कामा नये, त्यामुळे तुमचं मोठं नुकसानं होऊ शकतं. तुमच्यावर पश्चतापाची वेळ येऊ शकते. मात्र तुम्ही जर त्या गोष्टी गुप्त ठेवल्या तर तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल, असं आर्य चाणक्य म्हणतात. जाणून घेऊयात अशाच तीन गोष्टींबद्दल
आर्य चाणक्य म्हणतात जर तुम्ही तुमच्या मनात एखादी योजना आखली असेल तर तिची कुठेही चर्चा करू नका, तुमचा कितीही जवळचा मित्र असेल तरी देखील त्याला ती योजना सांगू नका, कारण त्यामुळे तुमच्या कार्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. जर ती योजना पूर्णत्वाला गेली नाही तर तुमच्यावर टीका देखील होऊ शकते. त्यामुळे अशा योजना गुप्त ठेवा.
धन – तुमच्याकडे किती पैसा आहे हे चुकूनही इतरांना सांगू नका, यामुळे शत्रू निर्माण होण्याचा धोका असतो असं आर्य चाणक्य म्हणतात. जर तुमच्याकडे जास्त धन असेल तर तुम्हाला शत्रू तयार होतील आणि जर तुमच्याकडे धन नसेल तर तुम्हाला कोणीही विचारणार नाही असं आर्य चाणक्य यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना आर्य चाणक्य म्हणतात की जर तुमचं एखादं गुपीत असेल ज्यामुळे तुम्ही कमजोर होऊ शकता, असं गुपीत कोणालाही सांगू नका.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)