मुंबई : आचार्य चाणक्य (Chanakya Niti) हे महान व्यक्तीमहत्व होते. महान रणनीतीकार समजल्या जाणाऱ्या चाणक्याच्या धोरणांमुळे नंद वंशाचा नाश झाला आणि त्याच्याच धोरणांच्या जोरावर एक साधा मुलगा चंद्रगुप्त मौर्य मगधचा सम्राट झाला असे म्हणतात. चाणक्याला (Chanakya) केवळ राजकारणच नव्हे तर समाजाच्या प्रत्येक विषयाचे सखोल ज्ञान होते. आचार्य चाणक्य यांनी एक धोरणही तयार केले होते, ज्यामध्ये त्यांनी समाजातील जवळजवळ प्रत्येक विषयाशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख केला आहे. आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्र या पुस्तकात वैवाहिक (Married life) जीवनासाठी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
धोका
माणूस एकवेळा विष पचवू शकते. मात्र, दिलेला धोका कधीही विसरू शकत नाही. फसवणूक हे विषासारखे आहे असे चाणक्याने आपल्या नीतिशास्त्रात नमूद केले आहे. केवळ पती-पत्नीच नाही तर कोणत्याही नात्यात फसवणूक होऊ करू नये. जर पती-पत्नीचे नाते घट्ट करायचे असेल, तर आयुष्यात असे कधीही करू नका.
खोटे बोलणे
चाणक्य नीतीमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, पती-पत्नीच्या नात्यात खोट्याला वाव नाही. जर पती-पत्नी एकमेंकांना खोटे बोलले आणि ते काही दिवसांनी समजले तर नात्यामध्ये दुरावा येण्यास सुरूवात होते आणि नाते कमकुवत होते. त्यामुळे नात्यामध्ये कधीच खोटे बोलू नका. पती-पत्नीने एकमेकांशी एकनिष्ठ असले पाहिजे.
बोलताना नियंत्रण ठेवा
नात्यामध्ये कोणीही छोटी आणि कोणीही मोठे नसते. चाणक्य नीतीनुसार वैवाहिक जीवनातील हे वर्तन एक मोठी चूक असल्यासारखे आहे. पती-पत्नीने नेहमी एकमेकांना समान केला पाहिजे. असे केल्याने नात्यात गोडवा टिकून राहतो.
राग
आचार्य चाणक्य यांच्या मते, रागामुळे कोणतेही नाते इतके कमकुवत होऊ शकते की ते टिकण्याची शक्यता खूपच कमी होते. वैवाहिक जीवनात पती किंवा पत्नीने नेहमी आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे. रागाच्या भरात केलेल्या गोष्टी आपल्याला पश्चातापाशिवाय काहीही देत नाहीत. त्यामुळे राग करताना अगोदर विचार करा की, यावेळी आपण आपलेच नुकसान करतो आहोत.
संबंधित बातम्या :