शिस्त- नोकरी-व्यवसायात यश मिळवायचे असेल, तर आपल्या कामाशी प्रामाणिक आणि शिस्तबद्ध असणे अत्यंत आवश्यक आहे. आचार्य चाणक्यांच्या मते, शिस्तीनेच व्यक्तीमध्ये कठोर परिश्रम करण्याची भावना विकसित होते. शिस्तीशिवाय कोणतेही काम वेळेवर पूर्ण होत नाही. म्हणूनच यशस्वी होण्यासाठी शिस्त आवश्यक आहे.
कार्यक्षम असणे- व्यवसाय असो की नोकरी, माणूस कार्यक्षम असणं खूप गरजेचं आहे.कार्यक्षमतेमुळे व्यक्तिमत्व प्रभावी बनते. कार्यक्षम व्यक्तीला कुठल्याही क्षेत्रात यश मिळविणे सोपे जाते.
जोखीम घेण्याचे साहस- कोणत्याही व्यवसायात यशस्वी होण्यासाठी, जोखमीचे निर्णय घेण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. आचार्य चाणक्य यांच्या मते, तोच माणूस यशस्वी होतो जो अपयशाला घाबरत नाही. व्यवसायात योग्य वेळी घेतलेला निर्णय भविष्यात व्यक्तीला नफाच देतो.
टीमवर्क- ज्या व्यक्तीमध्ये सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची वृत्ती असते, तो आपल्या आयुष्यात यशस्वी होतो. एकटा माणूस यशस्वी होऊ शकत नाही. यशस्वी होण्यासाठी अनेक लोकांचे सहकार्य आवश्यक असते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीसोबत त्याच्या क्षमतेनुसार काम करा.