Chanakya Niti: आचार्यांच्या ‘या’ पाच गोष्टी लक्षात ठेवल्यास संकटांचा सहज करू शकाल सामना
चालताना प्रत्येक व्यक्तीने आपली दृष्टी खालीसुद्धा ठेवली पाहिजे. जे असं करत नाहीत, ते स्वत:साठी संकटांना आमंत्रित करतात आणि दुर्घटनांचा शिकार होतात. अशात शारीरिक समस्यांसोबतच आर्थिक नुकसानही सोसावं लागतं. (Chanakya Niti)
1 / 5
ज्या घरांमध्ये अन्नाचा साठा कधीच संपत नाही, जिथे स्त्रियांचा आदर केला जातो, पती-पत्नी एकमेकांसोबत प्रेमाने राहतात, तिथे लक्ष्मी मातेचा वास सदैव असतो. त्या घरात नेहमी तिजोरी भरलेला असतो.
2 / 5
चाणक्य नीती मध्ये सांगितल्या नुसार मधुर वाणी असणं अत्यंत गरजेचं आहे. स्वभावात विनम्रता असावी. हे दोन्ही गुण देवी लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहेत. याने समाजात संन्मान आणि आदर मिळतो. याचे पालन केले नाहीतर देवी लक्ष्मी तुमची साथ सोडते.
3 / 5
कोणतंही सुरू केलेलं काम मध्येच अर्धवट सोडू नका. चुकांमधून शिकण्याची वृत्ती ठेवा. सकारत्मकतेमे पुढे चला. पुढे जाण्यासाठी अनेकदा तुम्हाला कठीण निर्णय घेऊन पुढे जावं लागतं. त्यामुळे स्वत: परिस्थितीला सामोरं जायला तयार रहा. त्याचबरोबर दुसरी पर्याय ही कायम सोबत ठेवा.
4 / 5
तुम्ही नविन काम सुरू करणार आहात. नविन काम सुरू करण्याचा विचार तुम्ही करत आहात. याची जरा पण खबर दुसऱ्यांना लागून देऊ नका. तुमचं भविष्यातील प्लॉनिंग कोणाला सांगू नका. त्याने तुमचं काम बिघडू शकतं. तुमच्याशी स्पर्धा करणारे लोक तुमच्या कामात बाधा आणू शकतात.
5 / 5
आचार्य चाणक्य यांच्या मते जेव्हा तुम्ही एखादं नवं काम करता तेव्हा अनेक लोक वेगवेगळ्या गोष्टी सांगतच असतात. सुरूवतील तुम्हाला लोकांच्या अनेक गोष्टी ऐकाव्या लागतात. अनेक लोक वेगवेगळे सल्ले देतात. काही लोकांच्या गोष्टी ऐकून तुम्हाला तुमचा आत्मविश्वास कमी झाल्यासारखं ही वाटेल. पण, तुम्हाला स्वत:वर विश्वास ठेवला पाहिजे आणि योग्य दिशेने पाऊलं टाकली पाहिजेत. मेहनत केली पाहिजे.