Chanakya Niti : तिची नियत चांगली की वाईट? असं ओळखा; चाणक्यांच्या चार गोष्टी…
आर्य चाणक्यांनी कौटुंबीक जीवनाबाबत अनेकवेळा भाष्य केलं आहे. संसाराबाबतही त्यांनी अनेक टिप्स दिल्या आहेत. जीवनसाथी कसा निवडायचा, तो कसा आहे हे कसं ओळखायचं याच्याही टिप्स त्यांनी दिला आहे. एवढंच नव्हे तर चांगली नियत असलेल्या स्त्रीया आणि पुरुष यावरही त्यांनी भाष्य केलं आहे. त्यामुळेच चाणक्य नीती आजही वाचली जात असते.
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे महिलेचा हात असतो असं सांगितलं जातं. अनेकजण तर त्याबाबतचा आपला अनुभवही शेअर करतात. आपल्या यशाचं सर्व श्रेय आपल्या अर्धांगिणीनाल देतात. पण प्रत्येकवेळी असं होतं असंच नाही. कधी कधी त्याच्या उलटही होतं. एखाद्या पुरुषामुळे जशी स्त्री बरबाद होते, तसंच एखाद्या स्त्रीमुळे एखादा पुरुषही बरबाद होतो. पण या सर्व गोष्टी त्या महिलेची नियत काय आहे? यावर अवलंबून आहे. महिलेची नियत चांगली असेल तर सर्व आबादी आबाद होते.
चांगली नियत असलेली महिला नरकासमान घराला स्वर्ग बनवते. तर वाईट नियत असणाऱ्या स्त्रीकडून सुंदर महालाचा सत्यानाशही होतो. हेच तत्त्व पुरुषांच्या बाबतही लागदू पडते. आर्य चाणक्यांनी महिलांची नीती, गुण आणि अवगुणांची नेहमी चर्चा केली आहे. चाणक्यांनी काय काय संकेत दिले आहेत, तेच आपण पाहत आहोत. चांगल्या नियतीच्या महिला कोणत्या हे आपण चाणक्यांनी दिलेल्या माहितीतून जाणून घेऊ शकतो. पण ही माहिती केवळ महिलांनाच नव्हे तर पुरुषांनाही लागू पडते.
महिलांची नियत कशी ओळखाल?
1. चाणक्य नीतीनुसार, महिलांची निती ओळखायची असेल तर ती महिला किती सुंदर आहे किंवा सिंपल आहे या गोष्टीचा काही फरक पडत नाही. ती महिला किती शिकलेली आहे किंवा अडाणी आहे, याचाही काही फरक पडत नाही. त्या महिलेचे संस्कार काय आहेत? हे सर्वात महत्त्वाचे आहे. त्यावरच अधिक लक्ष दिलं पाहिजे. जर त्या महिलेच्या वागणुकीत चांगले संस्कार दिसत असेल तर ती तुमच्या घराचा स्वर्ग बनवेल. पण ज्या महिलांमध्ये संस्कार नावाची गोष्ट नसेल त्या तुमच्या घराची वाट लावतील.
2. चाणक्य नीतीनुसार, ती महिला किती विश्वासास पात्र आहे, यावरूनही तिच्या नियतीचा अंदाजा घेऊ शकता. महिला इमानदार असेल, तिची कामे जबाबदारीने करणार असेल, दुसऱ्यांचा विश्वास तोडत नसेल तर ती महिला चांगल्या नियतीची आहे. फसवणारी, खोटं बोलणारी, बेफिकीर महिलांची नियत चांगली नसते. अशा महिलांपासून दूर राहिलं पाहिजे.
3. सुख आणि दु:ख हे जीवनाचे दोन महत्त्वाचे भाग आहेत. सुख आणि दु:खात जो साथ देतो तोच खरा जीवनसाथी असतो. खांद्याला खांदा लावून प्रत्येक संकटावर मात करण्याचं काम जो करतो तोच खरा जीवनसाथी असतो. जर एखादी महिला सुखाच्या काळात आनंदी राहते, दुस्वास करत नाही, हवेत उडत नाही, तिला अहंकार होत नाही आणि दु:खातही तितक्याच ताकदीने साथ देते तिची नियत चांगली असते. पण सुखात अहंकाराने पछाडलेली, दु:खात साथ न देणारी, स्वार्थ बगणारी महिला कधीच चांगली नसते.
4. पैसा अशी गोष्ट आहे की त्यामुळे भल्या भल्याची नियत फिरते. त्यामुळे कोणत्याही महिलेची नियत तपासायची असेल तर तिची पैशाबाबतची लालच पाहा. जी महिला पैशांच्या मागे वेडी असते ती तुम्हाला कधीही धोका देईल. पैशाला लालची असलेल्या स्त्रीची नियत कधीच चांगली नसते. पण लालच नसलेली स्त्री घर चांगलं चालवते. कुटुंब एकत्र ठेवते आणि बचत करत असते.