Chanakya Niti : आयुष्यात या 4 लोकांसोबत कधीच घेऊ नका, हाताने ओढावून घ्याल संकट!
आचार्य चाणक्य यांनी आपल्या धोरणांमध्ये मानवाच्या कल्याणासाठी काही आवश्यक गोष्टी सांगितल्या आहेत. आयुष्यात कधीही लोकांशी या चार लोकांसोबत वाद घालू नये, असं चाणक्यांनी सांगितलं आहे.
मुंबई : आजकाल लोकांमध्ये वाद होताना आपण मोठ्या प्रमाणात पाहतो. मित्र-मैत्रिणींमध्ये, आपल्या नातेवाईकांसोबत किंवा आपल्या प्रिय व्यक्तीसोबत काहीना काही कारणांमुळे भांडणं होतच असतात. पण तुम्हाला माहितीये का हीच भांडणं तुमच्यासाठीच हानिकारक ठरू शकतात.
आचार्य चाणक्य यांनी आपल्या धोरणांमध्ये मानवाच्या कल्याणासाठी काही आवश्यक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्यांनी सांगितल्यानुसार, आयुष्यात व्यक्तीने कधीही लोकांशी वाद घालू नये, कारण ते वाद त्या व्यक्तीलाच घातक ठरू शकतात.
चाणक्यांच्या मते, अनेक लोक आपल्या आयुष्यात यश मिळवू शकत नाहीत. कठीण परिस्थिती आली की ते आपलं ध्येय अर्धवटच सोडतात. तर अशा लोकांना भित्रा म्हटले जाते. कारण ते आलेल्या अडचणींना घाबरून आपलं ध्येय सोडून देतात. अशा लोकांना यश कधीच मिळत नाही.
चाणक्यांच्या मते, आपल्या प्रियजनांशी कधीही वाद घालू नये. त्यामुळे तुमचंच नुकसान होऊ शकतं. कारण काही असे लोक असतात जे आयुष्यात पुढे जाण्यासाठी अन्य लोकांना प्रेरणा देतात. हे लोक तुमच्याच कुटुंबातील कोणीतरी किंवा दूरचे नातेवाईक असू शकतात. त्यामुळे अशा लोकांशी वाद घालू नये.
प्रत्येकाच्या आयुष्यात एक खास मित्र असतोच. अशा मित्रासोबत आपण आपल्या आयुष्यातील सर्व सुख-दु:ख शेअर करत असतो. चाणक्यांच्या मते, अशा खास मित्राशी कधीही वाद घालू नये. कारण जर तुम्ही त्याच्याशी वाद घातला तर तो मित्र तुम्ही त्याला सांगितलेली सिक्रेट गोष्ट वेळ आल्यावर तो तुमच्याविरुद्ध वापरू शकेल. त्यामुळे मित्राशी कधीही वाद घालू नये.
सर्वांच्या आयुष्यात गुरू हा असतोच. तर आपण आपल्या गुरूशी कधीही वाद घालू नये. कारण चाणक्यांच्या मते, गुरु ही अशी व्यक्ती आहे जी जीवनात योग्य मार्ग दाखवत असते. गुरूशिवाय ज्ञान मिळणे अशक्य आहे. त्यामुळे कधीही गुरूशी वाद घालू नये. याचा तुमच्या भविष्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
चाणक्यांच्या मते, आयुष्यात मूर्ख व्यक्तीशी कधीही वाद घालू नये. कारण अशा व्यक्तीशी तुम्ही वाद घालत बसला तर तुमचाच वेळ वाया जाऊ शकतो. म्हणूनच अशा व्यक्तीच्या तोंडी कधीही लागू नये.