Chanakya Niti : आचार्य चाणक्यांच्या मते या 3 गोष्टी करताना कोणतीही लाज बाळगू नका, नाहीतर नुकसान झालेच म्हणून समजा
आचार्यांचे यांचे जीवन दारिद्र्य आणि संघर्षात गेले. पण संकटांवर मात करुन आचार्य यांनी त्यांचा प्रत्येक संघर्ष हा जीवनाचा (Life) धडा समजून मोठ्या आव्हानांवर मात केली.
मुंबई : आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) एक कुशल राजकारणी, चतुर मुत्सद्दी, कुशल अर्थतज्ञ आणि अभ्यासू विद्वान अशी प्रतिमा डोळ्यासमोर येते. आचार्यांचे यांचे जीवन दारिद्र्य आणि संघर्षात गेले. पण संकटांवर मात करुन आचार्य यांनी त्यांचा प्रत्येक संघर्ष हा जीवनाचा (Life) धडा समजून मोठ्या आव्हानांवर मात केली. आचार्य यांनी तक्षशिला विद्यापीठात शिक्षण घेतले होते, तिथे राहून त्यांनी काही काळ शिक्षक म्हणूनही काम केले . दरम्यान, आचार्य यांनी अनेक रचनाही केल्या होत्या. निती शास्त्र ही सुद्धा त्या रचनांपैकी एक आहे, ज्याला चाणक्य नीती (chankaya Niti) असेही म्हणतात. चाणक्य नीतीमध्ये, आचार्यांचे शब्द जीवन व्यवस्थापन टिप्स म्हणून वाचले जातात. चाणक्य नीतीमध्ये आचार्यांनी अशा तीन गोष्टी सांगितल्या आहेत, जिथे लाजेने माणसाचे स्वतःचे नुकसान होते.
- ज्ञान मिळवणे आचार्यांनी आपल्या जीवनात शिक्षणाला खूप महत्त्व दिले आहे. आचार्यांच्या मते, शिक्षणामुळे माणसाला मान, सन्मान आणि पैसा मिळतो. सुशिक्षित माणूस आयुष्यात कधीही रिकामा राहत नाही. त्यामुळे शक्य तितके ज्ञान आत्मसात केले पाहिजे. गुरूंसमोर तुमची उत्सुकता व्यक्त करण्यास कधीही संकोच करू नका. ज्याला गुरूकडून ज्ञान मिळण्याची लाज वाटते, तो स्वत:चे एवढे मोठे नुकसान करून घेतो की, त्याचे जीवन कधीच ते नुकसान भरून काढू शकत नाही.
- पैसे उधार दिले आचार्य चाणक्य म्हणायचे की जर तुम्ही एखाद्याला वेळेवर मदत करण्याच्या उद्देशाने पैसे दिले असतील तर वेळ आल्यावर पैसे मागायला लाज वाटू नका. ज्यांना स्वतःचे पैसे परत मागायला लाज वाटते, ते पुन्हा पुन्हा स्वतःचे नुकसान करतात. त्यामुळे पैसा तर जातोच, शिवाय नातंही बिघडतं.
- पोटभर जेवण करा जर तुम्ही कुठेतरी जेवायला बसला असाल तर जेवायला संकोच करू नका. पोटभर जेवण करा. अर्ध्या पोटी जेवून, आपण कोणासाठी खूप बचत करणार नाही, परंतु आपण आपलेच नुकसान कराल. त्यामुळे नेहमी गरजेनुसार अन्न खाल्ल्यानंतरच उठले पाहिजे.
संबंधीत बातम्या :
3 march 2022 Panchang | 3 मार्च 2022, गुरुवारचे पंचांग, शुभ मुहूर्त आणि राहुकाळ
सुख आणि नशिबाची साथ हवी असेल तर या गोष्टी करायला विसरू नका