Chanakya Niti : पुरुष आणि स्त्रियांच्या ‘त्या’ 3 सवयी ठरतात बर्बादीचं कारण; चाणक्यांनी असं काय सांगितलं?
चाणक्य नीतीनुसार, काही वाईट सवयी वैवाहिक जीवनाला धोका निर्माण करू शकतात. लेखात पुरूष आणि स्त्रियांच्या तीन अशा सवयींचा उल्लेख आहे, ज्या घरातील शांतता आणि आर्थिक स्थिरता बिघडवू शकतात. यात स्वतःचेच बनवलेले नियम पाळण्यात अनास्था, अन्नाची नासाडी आणि वायफळ खर्च यांचा समावेश आहे. या सवयी टाळल्यास सुंदर आणि सुसंवादी दाम्पत्य जीवन जगता येईल.
नवरा-बायकोचं नातं अत्यंत सुंदर असतं. लग्नाच्या निमित्ताने दोन अनोळखी माणसं एकत्र येतात आणि जीवनभर एकत्र राहतात. एवढंच नव्हे तर प्रत्येक सुख आणि दु:ख वाटून घेतात. प्रत्येक संघर्षाचा सामना करतात. आयुष्यात दोघंही पारदर्शकता ठेवतात. विश्वासावरच हे नातं टिकून असतं. पण काही लोकांच्या नात्यात या गोष्टींचा अभाव निर्माण होतो आणि मग खटके उडायला सुरुवात होते. आचार्य चाणक्यांनी त्यांच्या नीतीशास्त्रात काही अशा गोष्टींचा उल्लेख केलाय. त्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. पुरुष आणि स्त्रियांच्या तीन सवयींवर चाणक्यांनी भाष्य केलंय. या कोणत्या तीन सवयी आहेत, त्यावरच आज आपण प्रकाश टाकणार आहोत.
काही गोष्टी स्वीकारणं आणि काही गोष्टी सोडून देणं हेच खरं आयुष्य असतं. आयुष्यात कधीच कोणत्याही गोष्टीला कुरवाळत बसू नये. नाही तर आयुष्याचं गणित बिघडतं. चाणक्यांनीही अशाच काही सवयींवर भााष्य केलं आहे. पुरुष आणि स्त्रियांच्या दोघांच्याही या सवयी त्यांच्यासाठी हानिकारक ठरू शकतात. घराची बरबादी करू शकतात. खरं तर घराचा एक प्रमुख असतो. मग ती स्त्री असो की पुरुष. त्यांचाच घरातील प्रत्येक गोष्टींवर प्रभाव पडत असतो.
घरात लहान लोक मोठ्यांचं अनुकरण करत असतात. मोठ्या बहीण भावांचं पाहून छोटे बहीण भाऊ तसेच वागायला लागतात. त्याच प्रमाणे घराचा प्रमुख कुटुंबातील इतर सदस्यांना वाईट सवयी शिकवत असतात. तसेच तेही या वाईट सवयींचा अवलंब करत असतात. त्यामुळे घरातील प्रमुखाने करू नयेत अशा गोष्टी चाणक्यांनी सांगून ठेवल्या आहेत. त्याचं पालन केल्यास आयुष्य सुसह्य झाल्याशिवाय राहणार नाही.
स्वत:च नियमांचं पालन न करणं
घरातील प्रमुख किंवा मोठी व्यक्ती असल्याने तुम्ही जे नियम तयार करता तेच नियम तुम्ही स्वत: पाळत नाहीत. ते नियम तुम्हीही पाळले पाहिजे. स्वत:पासून नियमांचं अंमलबजावणी केली पाहिजे. नेहमी असं होतं की घरातील प्रमुख व्यक्ती घरासाठी नियम आणि कायदे बनवतो, घरातील सदस्य ते पाळतातही. मात्र नियम तयार करणारा व्यक्तीच नियम पाळत नाही. त्यामुळे मग हळूहळू घरातील इतर व्यक्तीही नियमाच्याबाहेर जाऊन वागू लागतात. चाणक्य म्हणतात, जे नियम तुम्ही दुसऱ्यांसाठी बनवता, ते तुम्हीही पाळले पाहिजे.
जेवणाची नासाडी
जेवणाची नासाडी करणं ही अत्यंत वाईट सवय असल्याचं चाणक्य नीतीत म्हटलं आहे. घराती मोठी माणसं किंवा कर्ते पुरुष अन्नाची नासाडी करू नका असा सल्ला देतात. पण ते स्वत:च अन्नाची नासाडी करतात. घरातील कर्त्या पुरुषांनीच अन्नाची नासाडी केली तर आर्थिक समस्या निर्माण होऊ शकते. घरात तणाव निर्माण होऊ शकतो.
वायफळ खर्च
चाणक्यांच्या मते, पैशांचा अपव्यय ही चांगली सवय नाही. जे लोक घर सांभाळतात, घर खर्च चालवतात त्यांनी पैशाचा हिशोब चांगला ठेवला पाहिजे. वायफळ खर्च करणे योग्य नाही. यामुळे घरात बरकत राहत नाही.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)