मुंबई : या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण येत्या 19 नोव्हेंबर 2021 शुक्रवारी होणार आहे. यावेळी सुपरमून होणार आहे. पुराणांच्या मते ज्या दिवशी चंद्रग्रहण होईल त्या दिवशी कोणतेही शुभ कार्य करु नये असे म्हणतात. एवढेच नाही तर ग्रहण काळात घराबाहेरही पडू नये, असे सांगितले आहे. या दिवशी जेवढी शक्य तेवढी देवाची पूजा करावी, असंही म्हणतात. यामध्येच गरोदर महिलांसाठी काही प्रथा आहेत. बऱ्याच ज्योतिष विद्वानांचा असा विश्वास आहे की गर्भवती स्त्रियांनी चंद्रग्रहणादरम्यान बाहेर पडू नये, तर काहीजण थेट ते पाहण्यास नकार देतात. दुसरीकडे, बर्याच लोकांचा असा विश्वास आहे की चंद्रग्रहणाच्या दिवशी गरोदर महिलेने चंद्रला पाहील्यास मुलाला शररीक त्रास उद्भवू शकतो.
पौर्णिमेच्या रात्री चंद्रग्रहण असते, जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत अगदी जवळून संरेखित होतात आणि पृथ्वी ही सूर्य आणि चंद्राच्या मधोमध येते. हे थेट सूर्यप्रकाशाला चंद्रापर्यंत पोहोचण्यापासून रोखते, ज्यामुळे त्यावर छाया पडते. दरम्यान, जेव्हा पृथ्वी चंद्राला पूर्णपणे झाकून टाकते तेव्हा त्याला पूर्ण चंद्रग्रहण म्हणतात. ब
धार्मिक मान्यतांनुसार, सूर्य किंवा चंद्रग्रहण अशुभ मानले जाते. या वर्षातले शेवटचे चंद्रग्रहण याच महिन्यात होणार आहे. हे चंद्रग्रहण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, पूर्व आशिया, उत्तर युरोप आणि अमेरिकेत दिसणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी होणारे चंद्रग्रहण आंशिक असेल, ज्याचा प्रभाव भारतातील आसाम आणि अरुणाचल प्रदेशात काही काळ दिसून येईल. ज्योतिषशास्त्रानुसार, वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ त्रासदायक ठरु शकतो.
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे.
इतर बातम्या :
Day wise work | शुभफळ मिळण्यासाठी योग्य दिवशी काम करा, बिघडलेली कामंसुद्धा चुटकीसरशी होणार
Day wise work | शुभफळ मिळण्यासाठी योग्य दिवशी काम करा, बिघडलेली कामंसुद्धा चुटकीसरशी होणारhttps://t.co/RPKzdAgLwQ#DayWiseWork | #WhichDayToDoWhichWork | #WorkAccordingtoTheDay
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 18, 2021