Lunar Eclipse 2021 : आज वर्षाचं पहिलं चंद्रग्रहण, भारतात कुठे दिसेल, ग्रहणाची वेळ काय? जाणून घ्या
कोणतेही ग्रहण धार्मिक आणि खगोलशास्त्रीय दृष्टीकोनातून एक अतिशय महत्वाची घटना मानली जाते. वर्ष 2021 चे पहिले चंद्रग्रहण (Chandra Grahan 2021) बुधवार 26 मे 2021 रोजी म्हणजेच आज होणार आहे.
मुंबई : कोणतेही ग्रहण धार्मिक आणि खगोलशास्त्रीय दृष्टीकोनातून एक अतिशय महत्वाची घटना मानली जाते. वर्ष 2021 चे पहिले चंद्रग्रहण (Chandra Grahan 2021) बुधवार 26 मे 2021 रोजी म्हणजेच आज होणार आहे. हा दिवस वैशाख महिन्याच्या पौर्णिमेचा दिवस आहे, याला बुद्ध पूर्णिमा देखील म्हणतात. हे चंद्रग्रहण वृश्चिक राशी आणि अनुराधा नक्षत्रात असेल. चंद्रग्रहण दुपारी 2 वाजून 17 मिनिटांनी प्रारंभ होईल आणि संध्याकाळी 7 वाजून 19 मिनिटांनी समाप्त होईल (Chandra Grahan 2021 On 26th May Know Where To Look In India And The Timings).
2021 चे पहिले चंद्रग्रहण काहीच तासांवर आलं आहे. ते पूर्व भारतात दिसेल. कोलकातामध्ये राहणारे लोक या दृश्याचा आनंद घेऊ शकतील. हे ग्रहण तिथे दुपारी 3:15 च्या सुमारास सुरु होईल आणि संध्याकाळी 6:22 वाजता समाप्त होईल. रिपोर्टनुसार, सुपर मून केवळ 14 मिनिटे 30 सेकंदांपर्यंत असेल.
या चंद्रग्रहणाशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घ्या –
1. हे चंद्रग्रहण भारतात कुठे दिसेल :
ग्रहणावेळी चंद्र बहुतेक भागांत पूर्व क्षितिजाच्या खाली असेल म्हणून भारतात ते दिसणार नाही. पण, हे ग्रहण काही मिनिटांसाठी बंगाल आणि पूर्व ओदिशामध्ये दिसेल, ज्यात भारताच्या पूर्व राज्यांच्या अरुणाचल प्रदेश, मिझोरम, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, आसाम आणि मेघालय यांचा समावेश असेल.
2. सूतक काळ :
भारतात हे चंद्रग्रहण उपछाया चंद्रग्रहण म्हणून पाहिले जाईल. यामुळे, चंद्रग्रहण होण्यापूर्वी 9 वाजता लागणारा सूतक काळ भारतात मान्य नसेल.
3. परदेशात कुठे दिसेल :
हे चंद्रग्रहण अमेरिका, उत्तर युरोप, पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया, प्रशांत महासागर आणि हिंद महासागराच्या काही भागात पूर्णपणे दिसून येईल. हे ग्रहण जपान, दक्षिण कोरिया, बांगलादेश, सिंगापूर, बर्मा, फिलिपिन्स आणि उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत दिसून येईल.
4. छाया चंद्रग्रहण म्हणजे काय :
ग्रहण होण्यापूर्वी चंद्र पृथ्वीच्या उपछायेत प्रवेश करतो. जेव्हा पृथ्वीच्या प्रत्यक्ष सावलीत प्रवेश न करता बाहेर पडतो तेव्हा त्याला उपछाया चंद्रग्रहण म्हणतात. उपछाया चंद्रग्रहणादरम्यान चंद्र पूर्णपणे अदृष्य होत नाही, बस थोडा अस्पष्ट दिसतो. परंतु जेव्हा चंद्र पृथ्वीच्या वास्तविक सावलीत प्रवेश करतो तेव्हा तो पूर्णपणे अदृश्य होतो. तेव्हा त्याला पूर्ण चंद्रग्रहण म्हणतात.
5. वर्ष 2021 मध्ये किती ग्रहण :
या वर्षी चार ग्रहण लागणार आहेत, दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण असतील. वर्षाचे पहिले ग्रहण म्हणून, प्रथम चंद्रग्रहण 26 मे रोजी लागणार आहे. तर दुसरे चंद्रग्रहण 19 नोव्हेंबर रोजी लागेल. तर 10 जूनला पहिले सूर्यग्रहण आणि 4 डिसेंबर रोजी दुसरे सूर्यग्रहण लागेल.
6. ग्रहणाविषयी धार्मिक मान्यता काय :
धार्मिक मान्यतेनुसार राहू आणि केतू वेळोवेळी चंद्र आणि सूर्यावर हल्ला करतात. जेव्हा ते सूर्य आणि चंद्रावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी सूर्य आणि चंद्र कमजोर होतात आणि ग्रहण लागतं. या काळात वातावरणात नकारात्मक ऊर्जा वाढते. त्यामुळे धार्मिक ग्रंथांमध्ये ग्रहण काळात कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे.
Chandra Grahan 2021 : या पूर्ण चंद्रग्रहणाला ‘सुपर ब्लड मून’का म्हणतात?https://t.co/lvnFboVgaU#SuperBloodMoon #LunarEclipse2021
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 24, 2021
Chandra Grahan 2021 On 26th May Know Where To Look In India And The Timings
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Chandra Grahan 2021 | चंद्रग्रहण कसे पाहावे आणि काय खबरदारी घ्यावी?