आंघोळ करताना करा या मंत्राचा जाप, मिळेल पवित्र नदीत स्नान करण्याचे पुण्य

हिंदू धर्मात पवित्र नदीत स्नानाला विशेष महत्त्व आहे. सर्वांनाच नदीत स्नान करणे शक्य नसते. अशा वेळी शास्त्रात काही मंत्र सांगण्यात आलेले आहेत ज्याच्या जपाने नदीत स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते.

आंघोळ करताना करा या मंत्राचा जाप, मिळेल पवित्र नदीत स्नान करण्याचे पुण्य
गंगा स्नानImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jul 14, 2023 | 12:32 PM

मुंबई : धर्मग्रंथात पवित्र नद्यांमध्ये स्नान (Ganga Bath Importance) करण्याचा महिमा सांगितला आहे. पवित्र नदीत स्नान केल्याने माणसाची सर्व पापे नष्ट होतात अशी धार्मिक मान्यता आहे. स्नान करताना मंत्रांचा जप करणे देखील खूप महत्वाचे आहे. घरात स्नान करतानाही या मंत्रांचा जप केल्यास पवित्र नदीत स्नान करण्याचे पुण्य मिळते. चला जाणून घेऊया ते कोणते मंत्र आहेत ज्याचा जप स्नान करताना केल्याने फायदा होतो.

मंत्र पठणाचे फायदे

हिंदू धर्मात प्रत्येक कामाचे पावित्र्य जपले जावे म्हणून मंत्रांशी जोडले गेले आहे. स्नानाच्या वेळी मंत्र पठण केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते असे शास्त्रात सांगितले आहे. त्याच वेळी, मनुष्याचे शरीर आणि आत्मा शुद्ध राहतात. एवढेच, या मंत्राचा जप केल्याने निरोगी आयुष्य मिळते. तसेच नकारात्मक ऊर्जा तुमच्यापासून दूर राहते. मान्यतेनुसार, आंघोळ करताना या मंत्राचा जप केल्याने राहूचा अशुभ प्रभाव कमी होतो.

आंघोळ करताना या मंत्राचा जप करा

मंत्र- गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वति। नर्मदे सिन्धु कावेरी जलऽस्मिन्सन्निधिं कुरु।।

हे सुद्धा वाचा

मंत्राचा अर्थ- ‘हे गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी नद्यांनो, तुम्ही सर्व माझ्या या पाण्यात स्नानाला या’ असा या मंत्राचा अर्थ आहे.

आंघोळीचे नियम देखील जाणून घ्या

हिंदू धर्मात सूर्योदयापूर्वी स्नान करण्याचा नियम आहे, त्यामुळे ब्रह्म मुहूर्तावर स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते. तीज सणाच्या दिवशी स्नानाच्या पाण्यात थोडे गंगाजल टाकून स्नान करावे. हिंदू मान्यतेनुसार चुकूनही अन्न खाल्ल्यानंतर लगेच आंघोळ करू नये. आंघोळ करण्याआधी स्नानगृह स्वच्छ करावे. आंघोळीच्या पाण्यात तुळस आणि कडूलिंबाचे पाने टाकावे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.