Chaturmas 2022: आजपासून चातुर्मासाला प्रारंभ; चातुर्मासातल्या या उपायांनी लाभेल आर्थिक स्थैर्य

आजपासून चातुर्मासाला (Chaturmas 2022) प्रारंभ होत आहे.  धार्मिक मान्यतेनुसार, चातुर्मास हा असा काळ आहे जेव्हा भगवान विष्णू योनिद्रेत (Bhagwan Vishnu Yognidra) जातात आणि सृष्टीचे कार्य भगवान शिवावर सोपवतात. या 4 महिन्यांच्या कालावधीत अनेक गोष्टी करणे वर्ज्य मानले जाते. त्याच वेळी, अशी काही कामे आहेत ज्यावर भगवान विष्णू तसेच भगवान शिव यांचा आशीर्वाद असल्याचे मानले जाते. […]

Chaturmas 2022: आजपासून चातुर्मासाला प्रारंभ; चातुर्मासातल्या या उपायांनी लाभेल आर्थिक स्थैर्य
Follow us
| Updated on: Jul 10, 2022 | 11:48 AM

आजपासून चातुर्मासाला (Chaturmas 2022) प्रारंभ होत आहे.  धार्मिक मान्यतेनुसार, चातुर्मास हा असा काळ आहे जेव्हा भगवान विष्णू योनिद्रेत (Bhagwan Vishnu Yognidra) जातात आणि सृष्टीचे कार्य भगवान शिवावर सोपवतात. या 4 महिन्यांच्या कालावधीत अनेक गोष्टी करणे वर्ज्य मानले जाते. त्याच वेळी, अशी काही कामे आहेत ज्यावर भगवान विष्णू तसेच भगवान शिव यांचा आशीर्वाद असल्याचे मानले जाते. यावेळी चातुर्मास 10 जुलै ते 4 नोव्हेंबर पर्यंत असेल. जाणून घ्या या काळात कोणती कामे शुभ मानली जातात.

चातुर्मासाविषयी अशी श्रद्धा आहे की, या काळात आपल्या देवतांचे अधिकाधिक मंत्र जपले पाहिजेत. यामुळे जीवनात सुख-शांती येण्याची शक्यता असते. या काळात शक्य तितके धार्मिक ग्रंथ वाचावे व धार्मिक कार्य करावे.

या काळात आपण जास्तीत जास्त दान करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.  गरजू लोकांना शक्य तितकी मदत करा. चप्पल, छत्री, कपडे इत्यादी अन्नपदार्थांसह गरजूंना दान करा.

हे सुद्धा वाचा

असे मानले जाते की, जो व्यक्ती चातुर्मासात गायींची काळजी घेतो आणि अन्नपदार्थ दान करतो. त्याच्यावर देवी-देवतांची विशेष कृपा सदैव राहते. या 4 महिन्यांत अन्न आणि गाईचे दान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. असे मानले जाते की या उपायाने अडकलेले पैसे परत मिळतात आणि कर्जाची समस्याही दूर होते.

या चार महिन्यात सूर्यदेव, भगवान विष्णू, भगवान शिव, भगवान गणेश आणि देवी पार्वतीच्या उपासनेचे विशेष महत्त्व मानले जाते.

चातुर्मासात हरभरा आणि गुळाचे दान केल्यास नोकरी आणि व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. तसेच यावेळी मंदिरात कापूर दान करणे देखील शुभ मानले जाते. यामुळे कुटुंबात सुख-शांती राहते.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.