Chaturmas 2023 : उद्यापासून चातुर्मास सुरू, या काळात अवश्य पाळा हे नियम
यंदा अतिरिक्त महिन्यामुळे चातुर्मास पाच महिने चालणार आहे. चातुर्मासाच्या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. चार महिन्यांच्या योगनिद्रानंतर, कार्तिक महिन्यात देवोत्थान एकादशीला जेव्हा भगवान विष्णू जागे होतात त्या दिवशी तुळशी विवाह करतात.
मुंबई : यंदा देवशयनी एकादशी (Devshayani Ekadashi 2023) 29 जूनला म्हणजेच उद्या आहे. देवशयनी एकादशीपासून येत्या चार महिन्यांपर्यंत विश्वाचे पालनहार भगवान विष्णू योग निद्रामध्ये जातात आणि श्रृष्टीचा कारभार भगवान शिवाच्या हातात सोपतात. या चार महिन्यांच्या कालावधीला चातुर्मास (Chaturmas 2023) म्हणतात. यंदा अतिरिक्त महिन्यामुळे चातुर्मास पाच महिने चालणार आहे. चातुर्मासाच्या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. चार महिन्यांच्या योगनिद्रानंतर, कार्तिक महिन्यात देवोत्थान एकादशीला जेव्हा भगवान विष्णू जागे होतात त्या दिवशी तुळशी विवाह करतात, त्यानंतर सर्व शुभ कार्ये पुन्हा सुरू होतात. चातुर्मासाचा काळ हिंदू धर्मात विशेष मानला गेला आहे. असे मानले जाते की या काळात सृष्टी भगवान शंकराच्या हातात असते. अशा स्थितीत या काळात काही कामं केल्याने श्री हरी विष्णू सोबत भगवान शिवाची कृपाही प्राप्त होते. त्याच वेळी, या काळात काही कामे करणे टाळावे.
गुरू पूजेला विशेष महत्त्व
आषाढ महिन्याच्या शेवटच्या काळात भगवान वामन आणि गुरुपूजेला विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्यात भगवान शिवाची पूजा केली जाते आणि त्यांचे आशीर्वाद सहज प्राप्त होतात. भगवान श्रीकृष्णाचा जन्म भाद्रपदात होतो आणि त्यांच्या आशीर्वादांचा वर्षाव होतो. अश्विन महिन्यात देवी आणि शक्तीची पूजा केली जाते. कार्तिक महिन्यात भगवान विष्णू पुन्हा जागृत होतात आणि संसारात शुभ कार्य सुरू होतात.
चातुर्मासात भोजनाचे नियम
चातुर्मासात एकच वेळ जेवण करणे उत्तम मानले जाते. या चार महिन्यांत तुम्ही जेवढे सात्विक राहाल, तेवढे चांगले. श्रावणात भाजीपाला, भाद्रपदात दही, अश्विनमध्ये दूध आणि कार्तिक महिन्यात डाळींचा त्याग करावा. या काळात शक्यतो पाण्याचा वापर करा. शक्य तितके आपले मन भगवंतात गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करा.
चातुर्मास पूजेचे नियम
आषाढ पौर्णिमेला गुरुची पूजा करावी. यामुळे जीवनातील सर्व संकटे दूर होतील. श्रावण महिन्यात भगवान शिवाची पूजा करा. यामुळे वैवाहिक जीवन, सुख आणि दीर्घायुष्य लाभेल. भाद्रपदात श्रीकृष्णाची पूजा करावी. हे संतती आणि विजयाचे वरदान देईल. अश्विनमध्ये देवी आणि श्रीरामाची पूजा करा. यामुळे विजय, शक्ती आणि आकर्षणाचे वरदान मिळेल. कार्तिकमध्ये श्री हरी आणि तुळशीची पूजा केली जाते. यातून भौतीक सुख आणि मुक्ती-मोक्षाचे वरदान मिळते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)