Chaturthi 2023: ‘या’ तारखेला आहे नवीन वर्षातली पहिली संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या महत्व आणि पुजा विधी

हिंदू धर्मग्रंथानुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी (Sankashti chaturthi 2023) व्रत केले जाते.

Chaturthi 2023: 'या' तारखेला आहे नवीन वर्षातली पहिली संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या महत्व आणि पुजा विधी
संकष्टी चतुर्थाImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 03, 2023 | 4:04 PM

मुंबई, हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीचे स्वतःचे वेगळे महत्त्व आहे. हे व्रत गणपतीला समर्पित आहे. या दिवशी गणेशाची पूजा केल्याने भक्तांचे सर्व संकट दूर होतात, अशी धार्मिक श्रध्दा आहे. हिंदू धर्मग्रंथानुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी (Sankashti chaturthi 2023) व्रत केले जाते. यावेळी संकष्टी चतुर्थीचे व्रत मंगळवार, 10 जानेवारी 2023 रोजी, माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला पाळला जाईल. याला अंगारकी चतुर्थी आणि लंबोदर संकष्टी चतुर्थी असेही म्हणतात.

संकष्टी चतुर्थी शुभ मुहूर्त

हिंदू दिनर्शीकेनुसार, माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थी व्रत 10 जानेवारी 2023 रोजी साजरा केला जाईल. संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त 10 जानेवारी रोजी दिवसा 12:09 वाजता सुरू होईल आणि 11 जानेवारी 2023 रोजी दुपारी 2:31 वाजता समाप्त होईल. उदयतिथीनुसार संकष्टी चतुर्थीचे व्रत 10 जानेवारीलाच पाळले जाईल. रात्री चंद्राला अर्घ्य दिल्यावरच हे व्रत सोडता येते. या दिवशी चंद्रोदयाची वेळ संध्याकाळी 08:41 असेल.

संकष्टी चतुर्थी पूजा पद्धत

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पहाटे लवकर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून व्रताचा संकल्प करावा. यानंतर श्रीगणेशाची पूजा करा आणि पूजेदरम्यान श्रीगणेशाला तीळ, गूळ, लाडू, दुर्वा आणि चंदन अर्पण करा. तसेच गणपतीला मोदक अर्पण करा. त्यानंतर श्री गणेशाची स्तुती करावी आणि मंत्रांचा जप करावा. दिवसभर फळांवर उपवास करताना, चंद्रोदयापूर्वी संध्याकाळी पुन्हा गणेशाची पूजा करा. चंद्रोदयानंतर चंद्राचे दर्शन घेऊन चंद्रदेवतेला अर्घ्य द्यावे. यानंतर उपवास करावा.

हे सुद्धा वाचा

संकष्टी चतुर्थी उपासना साहित्य

मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी चौरंग, लाल रंगाचे कापड, गंगेचे पाणी, उदबत्ती, दिवा, कापूर, दुर्वा, जनेयू, रोळी, कलश,  पंचामृत, लाल चंदन, पंचमी व मोदक व लाडू इ.

संकष्टी चतुर्थीचे महत्व

कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी संकष्टी चतुर्थी आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी विनायक चतुर्थी म्हणून ओळखली जाते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाची आराधना केल्याने सर्व संकटे दूर होतात. संकष्टी चतुर्थी हा गणपतीची पूजा करण्याचा विशेष दिवस मानला जातो. हा दिवस भारतातील उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये अधिक थाटामाटात साजरा केला जातो. संकष्टीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्याने घरातील नकारात्मक प्रभाव दूर होतो आणि शांतता कायम राहते. असे म्हटले जाते की गणेश घरातून येणारी सर्व संकटे दूर करतो आणि व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण करतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे.
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे.
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?.
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता.
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे.
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?.
आमच्या तंगड्यात- तंगड्या अडकलेल्या नाहीत,राऊत यांना शिरसाट यांचे उत्तर
आमच्या तंगड्यात- तंगड्या अडकलेल्या नाहीत,राऊत यांना शिरसाट यांचे उत्तर.
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत.
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?.
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली.