मुंबई : 28 आणि 29 मार्चला होळीचा सण साजरा केला जाईल (Holi Colours According To Your Zodiac Signs). 28 मार्चला होलिका दहन केलं जाईल तर 29 मार्चला रंगांची होळी खेळली जाईल. यावेळी होळीवर 499 वर्षांनंतर एक दुर्मिळ योग बनतो आहे. 29 मार्चला पौर्णिमेच्या दिवशी गुरु आणि शनि ग्रह आपल्या राशीत राहातील. तर चंद्रमा कन्या राशीत विराजमान असेल. त्याशिवाय यावेळी होळी सर्वार्थसिद्धी योगमध्ये साजरी केली जाईल. सोबतच या दिवशी अमृतसिद्धी योगही आहे (Choose Holi Colours To Play According To Your Zodiac Signs For Happiness And Prosperity).
हा दुर्मिळ योग सर्वांच्या जीवनात शुभता आणि सकारात्मकता घेऊन येणार आहे. त्यासाठी राशीनुसार रंगांची निवड करुन होळी साजरी करा. जाणून घ्या कुठल्या राशीच्या लोकांसाठी कुठला रंग असेल लकी….
या राशीचा स्वामी मंगळ आहे. मंगळाचा रंग लाल मानला जातो. त्यामुळे या राशीच्या लोकांनी लाल, गुलाबी किंवा या रंगांशी मिळत्या जुळत्या रंगांनी होळी खेळायला हवी. पलाशच्या फुलांनी बनलेल्या रंगांनीही होळी खेळू शकता.
वृषभ आणि तुला राशीचा स्वामी शुक्र आहे. तसं तर शुक्राचा रंग पांढरा असतो. पण सिल्व्हर किंवा पांढऱ्या रंगाने होळी खेळली जात नाही. त्यामुळे या लोकांनी फिकट निळा रंग आणि आकाशी रंगाने होळी खेळावी.
कन्या आणि मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. बुधचा रंग हिरवा मानला जातो. अशात हिरवा रंगाचा वापर यांच्या जीवनात सुख शांती आणणारा असेल. त्याशिवाय, हे लोक पिवळ्या, नारंगी आणि फिकट गुलाबी रंगानेही होळी खेळू शकता.
या दोन्ही राशींचा स्वामी शनिदेव आहे. शनिदेवचा रंग काळा किंवा निळा मानला जातो. अशात या राशीच्या लोकांसाठी सर्वात जास्त शुभ निळा रंग आहे. त्याशिवाय, हिरवा आणि फिरोजी रंगाचा वापरही करु शकता
या दोन्ही राशींचा स्वामी गुरु बृहस्पती आहे. या लोकांसाठी सर्वात लकी रंग पिवळा आहे. त्याशिवाय, नारंगी रंगाचा वापरही करु शकतात (Choose Holi Colours To Play According To Your Zodiac Signs For Happiness And Prosperity).
या राशीचा स्वामी चंद्र आहे. या लोकांनी पांढऱ्या रंगाने होळी खेळायला हवी. पण पांढऱ्या रंगाने होळी खेळणे शक्य नाही. त्यामुळे हे लोक कुठल्याही रंगात थोडं दही किंवा दूध मिसळून घ्या. त्यानंतर होळी खेळा फिर होली खेलें. मानसिक शांती लाभेल.
सिंह राशीचा स्वामी सूर्यदेव आहे. चटक रंगांना सूर्यदेवचा रंग मानला जातो. या लोकांनी नारंगी, लाल आणि पिवळ्या रंगाने होळी खेळू शकतात. यामुळे तुमच्या जीवनात यश आणि मान सन्मान वाढेल.
Rang Panchami 2021 : देवी-देवतांच्या होळीचा दिवस म्हणजे रंगपंचमी, जाणून घ्या कधी आणि कुठे साजरी केली जाते…https://t.co/kgDfAIZfpP#RangPanchami #Holi2021
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 26, 2021
Choose Holi Colours To Play According To Your Zodiac Signs For Happiness And Prosperity
संबंधित बातम्या :
Lathmar Holi 2021 | बरसाना येथे लठमार होळी, कधीपासून सुरु झाली ही परंपरा जाणून घ्या…