Christmas 2023 : घरातल्या या ठिकाणी ठेवू नये क्रिसमस ट्री, नकारात्मक उर्जा होते आकर्षित

क्रिसमसच्या दिवशी क्रिसमस ट्रीला विशेष महत्त्व आहे. हे जीवनाच्या निरंतरतेचे प्रतीक मानले जाते. ख्रिस्ती लोक क्रिसमसच्या झाडाला देवाने दिलेला आशीर्वाद म्हणून पाहतात. लोकांचा असा विश्वास आहे की क्रिसमस ट्री सजवल्याने मुलांचे आयुष्य वाढते. म्हणूनच क्रिसमसच्या दिवशी क्रिसमसच्या झाडाची सजावट केली जाते.

Christmas 2023 : घरातल्या या ठिकाणी ठेवू नये क्रिसमस ट्री, नकारात्मक उर्जा होते आकर्षित
क्रिसमस ट्रीImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Dec 20, 2023 | 3:54 PM

मुंबई : क्रिसमस (Christmas 2023)  येत आहे, जगभरातील लोकं उत्सवाची तयारी करत आहेत. क्रिसमस झाडाशिवाय क्रिसमस सण अपूर्ण आहे, कारण ख्रिसमसच्या दिवशी क्रिसमस ट्री खूप महत्त्वाचा मानला जातो. क्रिसमस सणाच्या अनेक दिवस आधी लोक आपल्या घरात क्रिसमस ट्री लावतात, जे खूप शुभ मानले जाते. क्रिसमस ट्री घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकते आणि घरात सकारात्मकता आणते. वास्तूच्या नियमांनुसार प्रत्येक वस्तूची स्वतःची योग्य दिशा किंवा ती ठेवण्याची जागा असते, जर ती वस्तू तिच्या योग्य ठिकाणी ठेवली तर ती वस्तू घरात सकारात्मकता आणते, ज्यामुळे घरात आनंद येतो. वास्तूनुसार क्रिसमस ट्री लावण्यासाठी एक निश्चित दिशा असते. क्रिसमस ट्री योग्य ठिकाणी ठेवल्यास घरातील वातावरणावर सकारात्मक परिणाम होतो. चला जाणून घेऊया वास्तूनुसार क्रिसमस ट्री घरात कुठे ठेवावे.

क्रिसमस ट्री कोणत्या दिशेने ठेवायचे?

वास्तूनुसार क्रिसमस ट्री घराच्या उत्तर दिशेला ठेवणे शुभ मानले जाते, ज्यामुळे घरात सकारात्मकता येते. जर तुम्हाला उत्तर दिशेला झाड ठेवता येत नसेल तर तुम्ही ते उत्तर-पश्चिम, उत्तर-पूर्व किंवा आग्नेय दिशेला लावू शकता.

या रंगांच्या दिव्यांनी क्रिसमस ट्री सजवा

क्रिसमस ट्री सजवण्यासाठी प्रत्येकजण रंगीबेरंगी दिवे वापरतो. वास्तूनुसार क्रिसमस ट्रीला दिव्यांनी सजवण्यासाठी लाल आणि पिवळ्या रंगाचे दिवे वापरावेत.

हे सुद्धा वाचा

या ठिकाणी ख्रिसमस ट्री ठेवू नये

वास्तूनुसार, काही ठिकाणे क्रिसमस ट्री ठेवण्यासाठी योग्य नाहीत, जसे की घराच्या मुख्य गेटसमोर, अस्वच्छ ठिकाणी किंवा खांबाजवळ. या ठिकाणी क्रिसमस ट्री ठेवल्यास घरात नकारात्मकता येऊ शकते.

क्रिसमसच्या दिवशी क्रिसमस ट्रीला विशेष महत्त्व आहे. हे जीवनाच्या निरंतरतेचे प्रतीक मानले जाते. ख्रिस्ती लोक क्रिसमसच्या झाडाला देवाने दिलेला आशीर्वाद म्हणून पाहतात. लोकांचा असा विश्वास आहे की क्रिसमस ट्री सजवल्याने मुलांचे आयुष्य वाढते. म्हणूनच क्रिसमसच्या दिवशी क्रिसमसच्या झाडाची सजावट केली जाते.

क्रिसमस ट्री इतिहास

क्रिसमस ट्रीबद्दल अनेक लोकप्रिय समजुती आहेत. एका मान्यतेनुसार, क्रिसमस ट्रीची सुरुवात 16 व्या शतकातील ख्रिश्चन सुधारक मार्टिन ल्यूथर यांनी केली होती. 24 डिसेंबर रोजी, मार्टिन ल्यूथर संध्याकाळी एका बर्फाळ जंगलातून चालत असताना त्याला एक सदाहरित झाड दिसले आणि या झाडाच्या फांद्या चंद्रप्रकाशाने चमकत होत्या. यानंतर मार्टिन ल्यूथरने आपल्या घरी हे झाड लावले आणि येशू ख्रिस्ताच्या वाढदिवसानिमित्त या झाडाला मेणबत्त्या इत्यादींनी सजवले.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.