Christmas 2023 : क्रिसमसच्या रात्री सांताक्लॉज का येतो? अशी आहे रंजक कथा

सांताचे रेनडिअर कसे उडत असेल असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल! क्रिसमस आणि सांताक्लॉजशी संबंधित अनेक समजुती आहेत. असे म्हटले जाते की वर्षांपूर्वी, जेव्हा सांताक्लॉजने रेनडियरवर चमकणारी जादूची वाळू शिंपडली तेव्हा ते लगेच उडू लागले.

Christmas 2023 : क्रिसमसच्या रात्री सांताक्लॉज का येतो? अशी आहे रंजक कथा
सांता क्लॉज Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Dec 20, 2023 | 9:32 PM

मुंबई : प्रतीक्षा संपणार आहे, 25 डिसेंबर रोजी क्रिसमसच्या निमित्ताने मुलांचा लाडका सांताक्लॉज (santa claus) भेटवस्तू तयार करण्यात व्यस्त आहे. पुन्हा एकदा ख्रिसमस ट्रीला सजवले जाईल, जिंगल्स बेल्सचा आवाज कानावर पडेल आणि भेटवस्तूंचा वर्षाव होईल. हो..हो..हो.. म्हणत लाल पांढऱ्या कपड्यात मोठी पांढरी दाढी आणि केस असलेला सांताक्लॉज पुन्हा मुलांच्या चेहऱ्यावर आनंद पसरवणार आहे. प्रत्येक मूल त्याच्या खांद्यावर भेटवस्तूंनी भरलेले पोते आणि हातात क्रिसमस बेल घेऊन येणाऱ्या सांताक्लॉजची वाट पाहत आहे. पाश्चिमात्य देश सोडले तर, बहुतेक देशांतील लोकांना सांताक्लॉज कोण आहे आणि तो कोठून आला हे माहित नाही. सांताप्रमाणेच त्याचा इतिहासही खूप अनोखा आहे.

क्रिसमस आणि सांता

क्रिस क्रिंगल सांताक्लॉज, ज्याला फादर क्रिसमस आणि सेंट निकोलस म्हणून ओळखले जाते, एक रहस्यमय आणि जादुई माणूस आहे ज्याच्याकडे सर्व चांगल्या आणि निरागस मुलांसाठी भेटवस्तू आहेत. असे म्हटले जाते की क्रिसमसच्या दिवशी, सांता बर्फाच्छादित उत्तर ध्रुवावरून आठ उडणाऱ्या रेनडिअरच्या स्लीगवर येतो. सांताच्या रेनडिअरची नावे रुडॉल्फ, डॅशर, डान्सर, प्रॅन्सर, व्हिक्सन, डँडर, ब्लिटझेन, कामदेव आणि धूमकेतू आहेत. खरं तर सांताक्लॉज हे काल्पनीक पात्र आहे. त्याला “सेंट निकोलस”, क्रिस क्रिंगल, फादर क्रिसमस म्हणूनही ओळखले जाते.

सांताचे रेनडिअर कसे उडत असेल असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल! क्रिसमस आणि सांताक्लॉजशी संबंधित अनेक समजुती आहेत. असे म्हटले जाते की वर्षांपूर्वी, जेव्हा सांताक्लॉजने रेनडियरवर चमकणारी जादूची वाळू शिंपडली तेव्हा ते लगेच उडू लागले. जादूची वाळू शिंपडून, रेनडिअर क्रिसमसच्या दिव्यांच्या वेगाने उडण्यास सुरवात करेल, जेणेकरून सांता प्रत्येक मुलापर्यंत पोहोचू शकेल आणि त्यांना भेटवस्तू देऊ शकेल. मुले गाढ झोपेत असताना, सांता भेटवस्तू सोडून पुढच्या मुलाच्या घरी जातो.

हे सुद्धा वाचा

सुमारे दीड हजार वर्षांपूर्वी जन्मलेला संत निकोलस हा खरा सांता आणि सांताचा पिता मानला जातो. संत निकोलस आणि येशूच्या जन्माचा थेट संबंध नसला तरी त्याच्याशिवाय क्रिसमस अपूर्ण वाटतो. सेंट निकोलसचा जन्म तिसऱ्या शतकात (300 ए.डी.), येशूच्या मृत्यूच्या 280 वर्षांनंतर, तुर्कस्तानमधील मायरा नावाच्या शहरात झाला. तो एका श्रीमंत कुटुंबातील होता. गरजूंना मदत करण्यासाठी निकोलस सदैव तत्पर असायचा.

क्रिसमस आणि नवीन वर्षाच्या दिवशी श्रीमंत आणि गरीब प्रत्येकाने आनंदी व्हावे अशी त्याची इच्छा होती. संत निकोलस यांचे मुलांवर विशेष प्रेम होते. येशू ख्रिस्ताच्या जन्मदिवशी तो कोणालाही दुःखी होताना पाहू शकत नव्हता. त्यामुळे नाताळच्या दिवशी तो भेटवस्तूंच्या रूपात लोकांना आनंद वाटण्यासाठी निघायचा. तो गरिबांच्या घरी जाऊन मुलांना खाद्यपदार्थ आणि खेळणी वाटायचा.

संत निकोलस आपल्या भेटवस्तू फक्त मध्यरात्री देत असत कारण त्यांना भेटवस्तू देताना दिसणे त्यांना आवडत नव्हते. या कारणास्तव मुलांना लवकर झोपायला लावले. त्याच्या उदारतेमुळे निकोलसला संत म्हटले जाऊ लागले. संत निकोलसच्या मृत्यूनंतर, सांता म्हणून कपडे घालणे आणि गरीब आणि मुलांना भेटवस्तू देणे ही परंपरा बनली. पुढे हा संत निकोलस सांताक्लॉज म्हणून प्रसिद्ध झाला. हे नवीन नाव डेन्मार्कच्या लोकांची देणगी आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.