साताऱ्यातील यमाई देवी तळे परिसर लखलखणार, मुख्यमंत्र्यांची 39.58 कोटींच्या कामांना मंजुरी

| Updated on: May 24, 2022 | 12:10 PM

यमाई देवी तळे (Yamai Devi Pond) औंध (Aundh) ग्रामपंचायतीच्या मालकीची आहे. मंदिर परिसरात सांस्कृतिक वैभव असून 400 वर्षांचा इतिहास (400 years of history) आहे.

साताऱ्यातील यमाई देवी तळे परिसर लखलखणार, मुख्यमंत्र्यांची 39.58 कोटींच्या कामांना मंजुरी
औंध येथील यमाई देवी तळे परिसर विकासाच्या कामास मुख्यमंत्र्यांची मान्यता.
Follow us on

मुंबई : सातारा (Satara) जिल्ह्यातील औंध येथे यमाईदेवी तळे (Yamai Devi Pond )सुशोभीकरणास आणि परिसर विकासाच्या कामास आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून हे काम करण्यात येणार आहे.यमाई देवी तळे (Yamai Devi Pond) औंध (Aundh) ग्रामपंचायतीच्या मालकीची आहे. मंदिर परिसरात सांस्कृतिक वैभव असून ४०० वर्षांचा इतिहास (400 years of history) आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह आदी उपस्थित होते. प्रारंभी सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी सादरीकरण केले.

मौजे औंध, ता. खटाव, जि. सातारा (Satara) येथील यमाई देवी तळे क्र. 1 व 2 ची सुधारणा करून परिसर विकसित करण्याबाबतचा रू. 39.58 कोटी किमतीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी, सातारा यांनी पर्यटन विभागाकडे सादर केला होता. त्यास उच्चाधिकार समितीची मान्यता मिळाल्यानंतर आज मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

हे सुद्धा वाचा

परिसर विकासाची कामे

यमाई देवी तळे औंध ग्रामपंचायतीच्या मालकीची आहे. मंदिर परिसरात सांस्कृतिक वैभव असून ४०० वर्षांचा इतिहास आहे. परिसर विकासाची कामे करण्यास संबंधित ग्रामपंचायतीची हरकत नसून काम पूर्ण झाल्यानंतर ग्रामपंचायत याची देखभाल दुरूस्ती करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.परिसराचा कायापालट होण्यास मदत मिळणार आहे.