Daily Horoscope 26 June 2022: ‘या’ राशीच्या राजकारण्यांसाठी आजचा दिवस फायद्याचा; आजचे राशिभविष्य
मेष- नोकरीत काही अतिरिक्त जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. मनःशांती असेल मात्र आत्मविश्वासाची कमतरता जाणवेल. जोडीदारासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. वृषभ- तुमचा पैसा कुठे खर्च होतोय यावर लक्ष द्या. भांडण करून तुमचा मूड खराब करू नका. प्रेमपूर्ण संबंध ठेवण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी तुमच्या अडथळे आणणाऱ्यांना अधोगतीला सामोरं जावं लागेल. मिथुन- आज तुमचं मन आध्यात्मिक असू […]
- मेष- नोकरीत काही अतिरिक्त जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. मनःशांती असेल मात्र आत्मविश्वासाची कमतरता जाणवेल. जोडीदारासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे.
- वृषभ- तुमचा पैसा कुठे खर्च होतोय यावर लक्ष द्या. भांडण करून तुमचा मूड खराब करू नका. प्रेमपूर्ण संबंध ठेवण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी तुमच्या अडथळे आणणाऱ्यांना अधोगतीला सामोरं जावं लागेल.
- मिथुन- आज तुमचं मन आध्यात्मिक असू शकतं. नोकरीत कामगिरी आनंददायी असणार आहे. राजकारण्यांना फायदा होणार आहे.
- कर्क- नोकरीची नवी संधी मिळू शकते. मात्र आजच्या दिवशी खर्च वाढण्याची शक्यता आहे. नवीन व्यवसाय सुरू होण्याची अपेक्षा आहे. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस फायद्याचा असेल.
- सिंह- आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या तुमच्यासाठी यशस्वी ठरू शकतो. जवळच्या व्यक्तीची भेटही होऊ शकतं. घरातील कोणत्याही सदस्याच्या तब्येतीची चिंता राहू शकते. शिवाय आजच्या दिवशी महत्त्वाची कामं अपूर्ण राहू शकतात.
- कन्या- आजच्या दिवशी तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. स्वभाव आज थोडा चिडचिडा राहण्याची शक्यता आहे. तर जुने मित्र भेटू शकतात. गेल्या काही दिवसांपासून असलेली प्रलंबित कामं पूर्ण होतील.
- तूळ- अचानक खर्च वाढल्याने मनात निराशा राहण्याची शक्यता आहे. दरम्यान कुटुंबातील कोणीतरी दूरच्या प्रवासाला जाऊ शकतं.
- वृश्चिक- विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात येणाऱ्या अडचणींवर मात करता येणं शक्य आहे. आजच्या दिवशी दूरचे नातेसंबंध बिघडू शकतात. घरातील मोठ्यांचा आदर करावा. तुमच्यावर नकारात्मक विचारांचा प्रभाव पडू देऊ नका. घरातील वातावरण प्रसन्न आणि स्वच्छ राहील.
- धनु- कोणत्याही अनैतिक कृत्यात सहभागी होऊ नका. तुम्ही करत असलेल्या खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. मौजमजेमुळे विद्यार्थी ध्येयापासून दूर जाऊ शकतात. पती-पत्नीमध्ये काही गैरसमजामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
- मकर- दूरचे नातेवाईक तुमच्याशी संपर्क साधू शकतात. मनावर नकारात्मक विचारांचा प्रभाव राहील. घरात वडीलधाऱ्यांशी वैचारिक मतभेद होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात. आजच्या दिवशी आरोग्याची काळजी घ्या.
- कुंभ- पैशाच्या व्यवहारात अधिक काळजी घेणं आवश्यक आहे. तुमच्यासोबत फसवणूक होऊ शकते. घरातील कोणतीही समस्या सोडवण्यासाठी बुद्धीचा वापर करा. कोणताही निर्णय घेण्यात जास्त वेळ घालवू नका.
- मीन- इतर लोकांच्या हस्तक्षेपामुळे तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये तेढ निर्माण होऊ शकतो. प्रॉपर्टीशी संबंधित काम पूर्ण होऊ शकतं.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)