Devshayani Ekadashi 2023 : या तारखेला आहे देवशयनी एकादशी, श्रीहरी जातील चार महिन्यांसाठी योग निद्रेत

धार्मिक मान्यतेनुसार, देवशयनी एकादशीपासून देवोत्थान एकादशीपर्यंत भगवान विष्णू क्षीरसागरातील शेषनागावर विसावतात. या चार महिन्यांत सर्व शुभ कार्यांवर बंदी असते.

Devshayani Ekadashi 2023 : या तारखेला आहे देवशयनी एकादशी, श्रीहरी जातील चार महिन्यांसाठी योग निद्रेत
देवशयनी एकादशीImage Credit source: Social media
Follow us
| Updated on: May 26, 2023 | 8:03 PM

नवी दिल्ली,  आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला देवशयनी एकादशी (Devshayani Ekadashi 2023) म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. देवशयनी एकादशीपासून भगवान विष्णू चार महिने निद्रा घेतात. त्यामुळे याला देवपद एकादशी, देवशयनी एकादशी किंवा आषाढी एकादशी (Aashadhi Ekadashi 2023) असेही म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार, देवशयनी एकादशीपासून देवोत्थान एकादशीपर्यंत भगवान विष्णू क्षीरसागरातील शेषनागावर विसावतात. या चार महिन्यांत सर्व शुभ कार्यांवर बंदी असते. या दरम्यान मुंडन, उपनयन संस्कार, विवाह इत्यादी महत्वाची शुभ कार्ये थांबवली जातात. असे मानले जाते की भगवान विष्णूच्या निद्राकाळात शुभ कार्य केल्याने व्यक्तीला त्यांचे आशीर्वाद मिळत नाहीत, त्यामुळे त्रास होण्याचा धोका असतो. देवशयनी एकादशी कधी आहे हे जाणून घेऊया.

देवशयनी एकादशी 2023 तारीख

पंचांगानुसार, आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी 29 जून 2023 रोजी पहाटे 3.18 वाजता सुरू होईल आणि ही तिथी 30 जून रोजी पहाटे 2.42 वाजता समाप्त होईल. पूजा तिथीनुसार, देवशयनी एकादशी व्रत 29 जून 2023 रोजी, गुरुवारी साजरी केली जाईल. या विशेष दिवशी रवियोग तयार होत आहे, जो सकाळी 05:26 ते दुपारी 04:30 पर्यंत असेल.

देवशयनी एकादशी व्रताचे महत्त्व

देवशयनी एकादशीच्या दिवशी स्नान आणि दानाचे विशेष महत्त्व आहे. गोदावरी नदीत स्नान करण्यासाठी या दिवशी नाशिकमध्ये मोठ्या संख्येने भाविक जमतात. एकादशीच्या दिवशी भाविकांनी तांदूळ, तृणधान्ये, मसाले यांसारखे विशिष्ट अन्नपदार्थ वर्ज्य करून उपवास ठेवावा. व्रत केल्याने जीवनातील अनेक समस्या दूर होतात आणि भगवान विष्णूचा आशीर्वाद सदैव राहतो. यासोबतच देवशयनी एकादशीला देवी लक्ष्मीची पूजा केल्याने साधकांना धन-समृद्धी मिळते आणि जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात.

हे सुद्धा वाचा

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.